शिवसेनेचे हे कसलं हिंदुत्व : राम कदम

Shiv Sena - Ram Kadam

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भिकारी म्हटले. हे शिवसेनेचे (Shiv Sena) कसलं हिंदुत्व आहे, असा सवाल भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला आहे.

सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटवरुन केली. राम मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताला योगदान द्यायचे आहे. राम मंदिरासाठी आपण किमान एकतरी वीट द्यावी, अशी भावना प्रत्येक हिंदुच्या मनात आहे. पण शिवसेनेचे मंत्री त्यांना भिकारी म्हणतात. शिवसेनेचे हे कोणत्या प्रकारचे हिंदुत्व आहे, असा सवाल राम कदम यांनी विचारला.

दरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER