काय आहे आयपीएलमधील विजय- पराभवांचे अनोखे वर्तुळ?

IPL 2020

यंदाची आयपीएल (IPL) कुणी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा अनिश्चिततेने भरलेली आहे. आतापर्यंतच्या १२ सामन्यांत  कोणताही संघ स्वतःला अपराजित राखू शकलेला नाही आणि प्रत्येकाने किमान एक तरी विजय नोंदवला आहे. त्यामुळे या संघाच्या विजय-पराभवांचे एक गमतीशीर वर्तुळ पूर्ण झालेय.

हे वर्तुळ कसे पूर्ण झाले  तर पहिल्या सामन्यात १९ तारखेला चेन्नई सुपर किंग्जने मुंबईवर विजय मिळवला; पण हा चेन्नईचा संघ पुढे दिल्ली कॅपिटल्सकडून हरला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभव टाळू शकला नाही. दिल्ली हरविणाऱ्या सनरायजर्सच्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मात देता आली नाही आणि बंगलोरला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभव टाळता आला नाही. बंगलोरला मात देणाऱ्या किंग्ज इलेव्हनला राजस्थान रॉयल्सने पराभूत केले आणि 30 तारखेला रॉयल्सचा पराभव कोलकाता संघाने केला. त्यासोबतच हे वर्तुळ पूर्ण झाले; कारण कोलकाता नाईट रायडर्सचा संघ २३ तारखेला मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) पराभूत झाला होता.

दृष्टिपेक्षात हे वर्तुळ असे… यातील पहिल्या क्रमांकाच्या संघाकडे लक्ष द्या… विजय आणि पराभव अशी त्यात साखळी तुम्हाला दिसेल.

  • विजयी संघ ————— पराभूत संघ
  • चेन्नई सुपर किंग्ज ——– मुंबई इंडियन्स
  • दिल्ली कॅपिटल्स ——— चेन्नई सुपर किंग्ज
  • सनरायजर्स हैदराबाद — दिल्ली कॅपिटल्स
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर— सनरायजर्स हैदराबाद
  • किंग्ज इलेव्हन पंजाब —- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • राजस्थान रॉयल्स ——— किंग्ज इलेव्हन पंजाब
  • कोलकाता नाईट रायडर्स— राजस्थान रॉयल्स
  • मुंबई इंडियन्स ————- कोलकाता नाईट रायडर्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER