शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्या खासदारांचा अभ्यास काय? – छगन भुजबळ

Sharad Pawar - Chhagan Bhujbal

नाशिक :- मराठा आरक्षण (Maratha Reservation) शरद पवारांमुळे (Sharad Pawar) मिळालं नाही, असं म्हणणाऱ्या खासदारांचा अभ्यास काय? असा प्रश्न राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. एवढंच नाही तर मराठा आरक्षणावरून भाजपाचं पडद्यामागचं राजकारण सुरू आहे, असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा नसतो. घटनेनुसार ते मिळत असतं; मात्र शरद पवारांवर आरोप करणाऱ्या खासदारांचा त्यावर अभ्यास नाही. त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करत आहेत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

९ डिसेंबरला मराठा आरक्षणाला सप्टेंबर महिन्यात मिळालेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका करण्यास सुरुवात केली. याबाबत छगन भुजबळ यांना विचारलं असता भाजपा मराठा आरक्षण प्रश्न पडद्याआडून राजकारण करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षण देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा नसतो. घटनेनुसार ते मिळत असतं मात्र शरद पवारांवर आरोप करणाऱ्या खासदारांचा त्यावर अभ्यास नाही त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करत आहेत असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेती-सिंचनासाठी आवर्तनाचे नियोजन करावे: पालकमंत्री छगन भुजबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER