आजही युवकांना वेड लावणाऱ्या RX-100 बाईकची काय आहे कहाणी?

What is the story of the RX-100 bike that still drives young people crazy?

भारतात आज अनेक प्रकारच्या बाईक्स आहेत. वेगवेगळ्या गाड्यांची क्रेज आली आणि निघूनही गेली. पण एक गाडी आहे जिची हवा आजही कायम आहे. बाजारात आल्यापासून हि गाडी तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलीये. याच गाडीबद्दल आज जाणून घेणार आहोत.

या गाडीचं नाव आहे यामाहा आरएक्स १००. हि (RX-100 bike)एक अशी गाडी आहे जिची लोप्रियता काळाबरोबर कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चाललीये. अनेक गाड्या आल्या आणि गेल्या परंतु यामाहाच्या या गाडीसारखी लोकप्रियता अजून कुणीही मिळवू शकलेलं नाही.

यामाहाच्या या गाडीच्या लोकप्रियतेमागे मोठं रॉकेट सायन्स नाही. ह्या गाडीचं शक्तिशाली इंजिन आणि कमी किंमत हेच या मागचं गमक आहे. या गाडीचं वजन कमी असल्याने ती धावायलाही जोरात आहे आणि याच कारणामुळे ती तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनली. कॉलेजमधल्या प्रत्येक मुलाचं ही बाईक घेण्याचं स्वप्न असतं.

या गाडीचा इतिहास काय ते जाणून घेऊ.

हि गोष्ट आहे १९७३ची जेव्हा जपानच्या यामाहा कंपनीने आरडी-३५० नावाची एक बाईक बाजारात आणली. रेसिंगवेड्या लोकांसाठी ही बाईक आकर्षक होती कारण या गाडीला पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक्स होते. या गाडीने सगळीकडेच हंगामा केला होता. त्यामुळे कंपनीने ह्या गाडीला भारताच्या बाजारपेठेत उतरवण्याचा निर्णय घेतला. आणि १९७३ला एस्कॉर्टस ग्रुपसोबत मिळून यामाहाने ‘राजदूत-३५०’ या नावाने आरडी ३५० या गाडीची भारतीय आवृत्ती भारत आणली.

भारतात मात्र हि गाडी जास्त प्रमाणात चालू शकली नाही. कारण भारतातील सामान्य लोकांना गाडीची किंमत परवडणारी नव्हती. शिवाय राजदूतचं मायलेजही चांगलं नव्हतं. राजदूतने भारतात यामाहा कंपनीची निराशा केल्यानंतर स्वस्त आणि टिकाऊ गाडी भारताच्या बाजारात उतरवण्यासाठी कंपनी विचार करू लागली. याच विचारातून यामाहा ‘आरेक्स १०० ‘ ने जन्म घेतला.

भारतात ही बाईक लॉन्च झाल्यानंतर लोकांचा विश्वास जिंकण्यात कंपनी यशस्वी ठरली. कंपनीने या गाडीचं उत्पादन १९८५ मध्ये सुरु केलं होतं. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच यामाहाने ५००० बाईक्स भारतीय बाजारपेठेत उतरवल्या होत्या. यामाहा आरेक्स १०० भारतात आल्यांनतर तिने इथल्या लोकांच्या मनावर राज्य केलं. प्रत्येकाला ती बाईक घ्यायची होती. कॉलेजच्या तरुणांमध्ये तिच्याबद्दल खूप कुतूहल होतं. रेसिंगवेड्या लोकांसाठी तर ही गाडी पर्वणीच ठरली.

या गाडीत ९८ सीसीचं २ स्ट्रोक्स असलेलं एयर कुल्ड सिंगल सिलिंडर इंजिन होतं. गाडीचं वजनही फक्त ९८ किलो होतं. गाडीला ४ स्पीड गियरबॉक्स होते आणि ती १०० किमी प्रतितासाच्या वेगाने धावायची. गाडीचा वेग जास्त असला तरीही खूप जास्त वेगात रस्त्यावर हि गाडी चालवणं धोकादायक होतं. ह्या गाडीचं वजन कमी असल्याने वेगात गाडीचं संतुलन बिघडयाचं आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती.

यामाहाच्या ह्या गाडीबद्दलचा एक वेगळा किस्साही आहे. हि गाडी आल्यानंतर अनेक अपराध्यांकडून अपराधासाठी ही गाडी वापरलाय जाऊ लागली होती. त्यामुळे ह्या गाडीला अपराध्यांची गाडी म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं होतं. नंतर बाजारात पल्सर आल्यानंतर तिला अपराध्यांची गाडी म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

या गाडीची सुरुवातीला किंमत १९७६४. आजच्या काळातला विचार केला तर त्या किंमतीला आजचे ६० हजार रुपये म्हणता येऊ शकेल. आजच्या काळात कोणतीही गाडी घायला जवळपास लाखभर रुपये मोजावे लागतात. त्यामुळे त्या काळाच्या दृष्टीने विचार केला तरीही ह्या आदींची किंमत बऱ्यापैकी स्वस्तच म्हणता येऊ शकते.

त्या काळी बाजारात हिरो होंडाची, होंडा सीडी १०० होती परंतु यामाहाच्या आरेक्स १०० च्या तुलनेत तिची विक्री कुठेही नव्हती. यामाहाच्या प्रेमात संपूर्ण पिढीचं पडली होती. सुरुवातीला आरेक्स १०० लाल, मोरपंखी आणि कळाया रंगात उपलब्ध होती, परंतु हळूहळू अनेक रंगात ही गाडी उपलब्ध झाली.

यामाहा अशी एकटी गाडी होती जिने १९८५ पासून १९९६ पर्यंत म्हणजे दशकभर भारताच्या रस्त्यांवर राज्य केलं. परंतु नांतर या गाडीचं उत्पादन कंपनीला थांबवावं लागलं. हि गाडी जेव्हा भारतात लॉन्च झाली होती तेव्हा प्रदूषणासंदर्भात जास्त कायदे भारतात लागू नव्हते. नंतर मात्र अनेक प्रदूषणासंबंधातील कायदे आले आणि गाडीने आपल्या इंजिनात तसे बदल केले नाहीत आणि गाडीचं उत्पादन थांबवलं.

गाडीचं उत्पादन थांबलं असलं तरीही हिची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळेच हि रस्त्यावर आजही धावताना दिसते. पण ही पूर्वीसारखी गाडी आता राहिलेले नाही. ही गाडी चालवणारे आपल्याला हवं तसं मॉडिफाय करून पर्यावरणपूरक पद्धतीने हि गाडी चालवताना दिसतात.

रजनीकांतच्या चित्रपटात ही गाडी वापरली गेली होती. तेव्हापासून तिची क्रेझ अजूनच वाढली. सुपरस्टार रजनीकांत या गादीवर बसून गुंडांना मारतोय हे बघून तरुणांना ह्या गाडीचा मोह आवरलाच जात नव्हता. या सोबतच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचीही ही सर्वात आवडती बाईक आहे. सिनेजगतापासून खेळापर्यंत प्रत्येकाला ह्या गाडीचं कौतुक होतं.

आजही अनेक तरुण ह्या गाडीच्या शोधात असतात. जुन्या लोकांकडून विकत घेऊन गाडीला मॉडिफाय करून यामाहा आरेक्स १००च्या सफरीची मजा लुटतात.

ही बातमी पण वाचा : एका सायकल दुकानदारानं हे मर्सेडीज् नावचं साम्राज उभारलं !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER