काय आहे बलुचिस्तानमधल्या मराठ्यांची कहाणी?

मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आपल्या सगळ्यांना तोंडपाठ आहे. मराठ्यांनी गाजवलेलं शौर्याचे दाखले आपण बोलताना हजारो वेळा देतो. मराठ्यांचा इतिहास आपल्या सर्व महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण भारत देशातील लोकांसाठी नेहमीच अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्याची स्थापना केली आणि तेव्हापासून सुरु झालेलं मराठा साम्राज्याचा इतिहास फक्त गौरवशालीच राहिला आहे.

मराठ्यांच्या इतिहासातली एकच गोष्ट आपल्याला ऐकावीशी वाटत नाही ती म्हणजे पानीपतचं युद्ध! 1761 मध्ये मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात पानीपतचं तिसरं युद्धं झालं. नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य पानीपतकडे निघालं. पानिपटाच्या या युद्धात मराठा सैनिकांनी जीवाची बाजी लावली. अहमदशहा अब्दालीच्या बलाढ्य सैन्याशी लढणं सोप्पी गोष्ट नव्हती. पण मराठे प्राणपणाने पानीपतात लढले, पण हाती यश लागू शकलं नाही . अहमदशाहाच्या बलशाली प्रचंड बलाढ्य सैन्याला वैजय मिळाला आणि युद्धात मराठा सैन्याला पराभव पत्करावा लागला.

काही मराठे महाराष्ट्रात आले तर काही पानिपतच्या आजूबाजूच्या प्रदेशात स्थायिक झाले त्यांना ‘रोड मराठे’ म्हटलं जातं. पण अहमदशहा अब्दालीच्या तवाडीत सापडलेल्या मराठ्यांना त्याने युद्धकैदी बनवलं. 22 हजार मराठा युद्धकैद्यांना सोबत घेऊन अब्दाली अफगाणीस्तानला निघाला.

अफगाणीस्तान कडे निघालेल्या मराठा युद्धकैद्यांनी पाकीस्तानचा पंजाब प्रांत ओलांडला. त्यापुढे डेरा बुगती क्षेत्र लागतं. हे क्षेत्र बलुचिस्तानात आहे. बलूची राज्यकर्त्याने पानिपतच्या युद्धात अब्दालीला मदत केली होती त्याबदल्यात अहमदशहा अब्दालीने संपूर्ण मराठा युद्धकैदी बलूची शासकाला देऊन टाकले.बलुचिस्तानमध्ये हे मराठे आता स्थायिक झाले असले तरीही त्यांचा सुरुवातीचा काळ भयंकर होता. पण मराठे हरणाऱ्यातले नव्हते. त्यांनी तिथेही जीवनाशी संघर्ष सुरु केला. लढवय्या मराठ्यांनी पाण्याची जागा शोधून शेती करायला सुरुवात केली. शेतीत प्रगती होऊ लागली आणि ते कायमचेच या भूमीवर स्थायिक झाले.

महाराष्ट्रातुन आलेल्या या युद्धकैद्यांची मीर नासिर खान नुरीने वेगवेगळ्या जमतीत विभागणी केली. हेच मराठे आता बुगती, मर्री, गुरचानी, मझारी आणि रायसानी म्हणून ओळखले जातात. बलुचीस्तान मधील मराठे आज मुस्लिम धर्मांतरीत झालेले असले तरी, त्यांच्या मनातला मराठी बाणा अनेक वर्षांनीही जिवंतच आहे. आपल्या शौर्याचा इतिहास ते अजूनही विसरलेले नाहीत. विसरण्यासारखा तो इतिहासच नाही.

आज हा समाज मुस्लिम म्हणून जगत असला तरीही मराठी संस्कृती विसरलेला नाही. आपल्याकडच्या लग्नकार्यातल्या अनेक प्रथा बलुचिस्तानातल्या या समाजात बघायला मिळतात. मराठी भाषेचे अनेक संदर्भा ही या समाजात दिसतात. आई हा शब्द बलुचिस्तानातल्या मराठा समाजात आजही वापरला जातो.

सिल्विया मॅथेसन यांच्या ‘टायगर्स ऑफ बलुचिस्तान ‘ पुस्तकात बुगती मराठा समाजाचा उल्लेख आहे.बलूची मराठ्यांबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे छ्त्रपती शिवरायांचे नातू शाहू महाराजांचं नाव बुगती मराठ्यांच्या उपजातीला दिलेलं आहे, ते शाहू मराठे म्हणून ओळखले जातात.आजही मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास जपत बलुचिस्तानात जगणारा मराठा समाज आजही मराठा समजाच्या ऐतिहासिक सिरियल आणि चित्रपट उत्साहाने बघतो.

नाना पटेकरांचा तिरंगा सिनेमाही त्यातल्या “मराठा मरता नही मारता है,” या डायलॉग मुळे बलुचिस्तानात प्रचंड गाजला होता.महाराष्ट्राशी एक भावनिक नातं असलेला बलुचिस्तानातला मराठा समाज आजही आपल्या शौर्याच्या कहाणी गर्वाने सांगतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER