
मुंबई :- चार लाख स्वयंसेवक मंदिराच्या वर्गणीनिमित्त संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेने ‘सामना’च्या संपादकीयमधून केला. त्यावर भाजपाचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला टोमणा मारला, “ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून लक्ष्य करावे हे स्वाभाविकच.
ही बातमी पण वाचा : निवडणुकीत भाजपाला दोन अंकी आकडाही गाठता येणार नाही; प्रशांत किशोर यांचा दावा
ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार? महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेनेने समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या आघाडीसाठी शिवसेनेला टोमणा मारताना भातखळकर यांनी दुसरे ट्विट केले – ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत त्या नवब्रिगेडी बाटग्याना रामवर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते.
तिसऱ्या ट्विटमध्ये भातखळकर यांनी पुन्हा शिवसेनेला टोमणा मारला – देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदिर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धांची काळजी करा!
ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून टार्गेट करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्व आणि ममत्व काय असणार???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत, त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला