स्वदेशी चळवळीतून जन्माला आलेला पार्ले जी… काय आहे या बिस्कीट आणि देशभक्तीचं नातं?

Parleg

‘जी माने जिनियस’ ही लाईन ऐकली नाही, असा कुणीच नसेल. ही लाईन कशा संदर्भात आहे? हे सांगण्याचीही गरज नाही. पार्ले जी भारतात इतका प्रसिद्ध झालाय की बिस्कीट या शब्दाचा पर्यायी शब्दच पार्ले-जी वाटतो.

पार्ले-जी स्वातंत्र्याच्या आधीपासुन लोकांच्या चहाचा सोबती आहे. पार्ले जी भारतात लोकांसाठी बनलेलं पाहिलं बिस्कीट आहे.  याच पार्लेजी बद्दल आज जाणून घेणार आहोत.

पार्ले जी स्वातंत्र्यापूर्वी पासून भारतात बनतंय. असं असलं तरीही पार्ले हि कंपनी आधीच सुरु झाली होती. पण ती बिस्कीट बनवत नव्हती. स्वातंत्र्यापूर्वी भारतात इंग्रजांचा दबदबा होता. विदेशी वस्तू भारतात विकल्या जात होत्या. त्यांच्या किमती खूप जास्त असल्याने फक्त श्रीमंत लोकांनाच त्या विकत घेता येत होत्या. त्या काळी इंग्रजांनी भारतात कँडी आणली होती, पण तिची किंमतही खूप जास्त असल्याने सगळ्यांना ती विकत घेता येणं शक्य नव्हतं. ही गोष्ट मोहनलाल दयाल यांना खटकत होती. स्वदेशी आंदोलनातून प्रभावित झालेल्या त्यांनी हा भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

त्यांनी विचार केला की भारतीयांसाठीही एक कँडी बनवली पाहिजे. विदेशी कंपनीची मक्तेदारी खोडून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केला. आणि टी जर्मनीला गेले. तिथे त्यांनी कँडी बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि आणि १९२९ साली ६० हजार रुपयांचं कॅन्डी बनवण्याचं कॅन्डी मेकर मशीन घेऊन ते भारतात परत आले.  तसं मोहनलाल आधी रेशम व्यापारी होते. पण आता त्यांनी एका नवा व्यापार करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी मुंबईतल्या विले-पार्ले मद्ये एक जुनी फॅक्टरी विकत घेतली आणि तिथे काम सुरु केलं.

या कंपनीत सुरुवातीला फक्त १२ कर्मचारी काम करत असत. हे सर्व कर्मचारी मोहनलाल दयाल यांच्या कुटुंबातलेच सदस्य होते. सगळ्यांनी प्रचंड मेहनत करून जुन्या फॅक्टरीला नवं रूप दिलं.

आता वेळ होती कंपनीला नाव द्यायची. कंपनी विले पार्लेमध्ये सुरु झाली होती म्हणून कंपनीला नाव दिलं ‘पार्ले’

सगळ्यात आधी पार्लेने ऑरेंज फ्लेवरचं चॉकलेट बनवलं होतं. लोकांना ते खुप आवडलं आणि पार्ले कंपनीची यशस्वी वाटचाल सुरु झाली. त्यांनतर त्यांनी वेगवेगळ्या प्राकारचे चॉकलेट्स बनवले. पण आता पार्ले कंपनीला नवनव्या गोष्टी बनवायच्या होत्या.

इंग्रज चहासोबत बिस्कीट खात असत. पण ते बिस्कीट महाग होतं. गरिबांना परवडण्यासारखं नव्हतं. मोहनलाल आता पार्ले कंपनीतून बिस्कीट बनवण्याच्या प्रयत्नात होते.

१९३९ मध्ये त्यांनी ‘पार्ले ग्लुको’ या बिस्कीटाची सुरुवात केली. गव्हापासून बनलेल्या या बिस्किटाची किंमतही कमी होती. किंमत कमी असल्याने सामान्य लोक हे बिस्कीट मोठ्या प्रमाणात खाऊ लागले. किंमत कमी असली तरीही ते चवीला उत्कृष्ट असल्याने इंग्रजही हे बिस्कीट खाऊ लागले होते.

त्याच काळात दुसर्या महायुद्धाचं बिगुल वाजलं होतं. भारताच्या बऱ्याचश्या सैनिकांना इंग्लंडच्या बाजूने लढण्यासाठी [पाठवलं गेलं होतं. त्यावेळी सैनिक पार्ले ग्लुकोचे पॅकेट्स सोबत घेऊन गेल्याचंही म्हटलं जातं.

पार्ले ग्लुकोची प्रसिद्धी खूप जोरात होत असल्याने अनेक ब्रिटिश बिस्किटांची मार्केटमधून पीछेहाट होऊ लागली होती.

दुसरं महायुद्ध संपेपर्यंत पार्ले ग्लुको मोठा ब्रॅन्ड झाला होता. पण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पार्ले ला बिस्किटाची निर्मिती थांबवावी लागली होती. भारतात गव्हाची कमी आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं होतं.

१९४७ला भारत स्वतंत्र झाला आणि देशाचं विभाजन झालं. यानंतर गव्हाची कमी अजून वाढली. लोकांना पार्लेची बिस्किटं आवडत होती. बिस्किटांची मागणी वाढू लागली होती. पण कंपनीने लवकरच पुन्हा प्रोडक्शन सुरु करू असं आश्वासन लोकांना दिलं.

काही दिवसात बिस्कीटाची निर्मिती पुन्हा सुरु झाली आणि लोकांना बिस्किटं मिळू लागली.

१९८२ मध्ये पार्ले ग्लुकोचं नाव बदलून पार्ले जी असं करण्यात आलं. पार्ले ला नाव बदलायचं नव्हतं पण त्यांना तसं करावं लागलं कारण पार्ले ग्लुको या नावाचा पार्ले कडे कॉपीराईट नव्हता. त्यामुळे बाकीच्या बिस्कीट कंपन्या ग्लुको नामाने बिस्कीट विकत होत्या. ग्राहकांनी ग्लुको बिस्कीट मागितल्यावर दुकानदार कोणत्याही कंपनीचे बिस्कीट ग्राहकांना देत असत. यामुळे पार्लेच्या विक्रीवर याचा परिणामी व्हायला लागला. त्यामुळे पार्लेने बिस्किटाचं नाव बदलून पार्ले जी केलं.

१९८२ मध्ये पार्ले ने टीव्हीच्या माध्यमातून जाहिरात करण्याचा निर्णय घेतला. आणि पार्ले जीची पहिली जाहिरात टीव्ही वर आली. याने त्यांच्या विक्रीवर कमालीचा फरक झाला. १९९१ पर्यंत पार्ले जी बिस्किटांच्या जगातला राजा झाला होता.

१९९८ मध्ये जेव्हा त्यांची विक्री थोडी कमी झाली आहे असं जेव्हा पार्ले कंपनीला जाणवलं तेव्हा त्यांनी शक्तिमान सोबत जाहिरात करण्याचा निर्णय घेतला. शक्तिमान तेव्हा सर्वांचा आवडता सुपरहिरो होता. शक्तिमानने सांगितलेली प्रत्येक गोष्ट लहान मुलं ऐकायची. त्यामुळे जेव्हा शक्तिमानने पार्ले जीची जाहिरात केली तेव्हा पार्ले जीचा खप पुन्हा वाढला. २००३ मध्ये पार्ले जी जगातलं सगळ्यात जास्त विकलं जाणारं बिस्कीट म्हणून घोषित करण्यात आलं.

आता कोरोना लोकडाऊन लागण्याआधीही पार्ले जी कंपनी डबघाईला आली होती पण लोकडाऊन मध्ये पुन्हा पार्ले-जी चा खप वाढला. जगभरात जवळपास ६० लाख दुकानांमध्ये पार्ले जी विकला जातो. जगभरात सर्वत्र खाल्ला जाणारा पार्ले जी आज जगात हिट आहे. सर्वांच्या जिभेवर असलेली त्याची चव वर्षानुवर्ष तशीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER