सैनीने पुकोव्हस्कीला बाद करण्यात कोणता घडला विक्रम?

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या (India Vs Australia) सिडनी कसोटीत (Sydney) भारतातर्फे नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि ऑस्ट्रेलियातर्फे विल पुकोवस्की (Will Pucovski) यांनी पदार्पण साजरे केले. योगायोगाने या तील विल पुकोव्हास्कीला (62 धावा) नवदीप सैनीनेच पायचीत बाद केले. याप्रकारे कसोटी पदार्पण करणाऱ्या एका खेळाडूने कसोटी पदार्पण करणाऱ्या दुसऱ्या खेळाडूला बाद केल्याची अनोखी नोंद झाली. अशाप्रकारची विशेष विकेट मिळविणारा नवदीप सैनी हा केवळ पाचवा भारतीय गोलंदाज आहे आणि पदार्पणातच अर्धशतक झळकावलेल्या पदार्पणवीर फलंदाजाला बाद करणारा तर पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.

दुसरीकडे विल पुकोव्हस्कीने सिडनीच्या मैदानावर कसोटी पदार्पणात भारताविरुध्द ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या अपयशाची मालिका मोडीत काढली. याच मैदानावर यापूर्वी भारताविरुध्द लेस जोसलीन (1968) व शेन वाॕर्न यांनी पदार्पण साजरे केले होते पण दोघे अपयशी ठरले होते.

जोसलीन फक्त 7 व 2 धावा काढून बाद झाले होते तर शेन वाॕर्नला दीडशे धावांच्या मोबदल्यात फक्त एक गडी बाद करता आला होता. मात्र आता विल पुकोव्हस्कीने पदार्पणातच 62 धावांची खेळी कैली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER