जामिनावर असलेल्या वाधवान बंधूंना राज्य सरकारने विशेष सेवा देण्याचे काय कारण? भाजपचे राज्यपालांना पत्र

मुंबई :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असताना मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन एक बडा उद्योजक आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतून महाबळेश्वरमध्ये दाखल झाला आहे. जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून आलेल्या या उद्योगपती व त्याच्या कुटुंबीयांसह महाबळेश्वर येथे आले आहे. यासंबंधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न केला आहे.

महाराष्ट्र सरकारने येस बॅंक घोटाळा प्रकरणात जामिनावर असणा-या वाधवान बंधूंना  मुंबई ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी विशेष पास, परवानगी का दिली? तसेच त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप असताना महाराष्ट्र सरकारने त्यांना  व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली? असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे.