स्टेडीयम नामकरणावरून मोदींवर होणाऱ्या टिकेचा काय आहे राजकीय अर्थ?

PM Narendra Modi - Jitendra Awhad

जगातले सर्वात मोठे स्टेडीयम म्हणून मॉटेरा स्टेडीयमची ओळख होती. या जगप्रसिद्ध स्टे़डियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. यापुढे अहमदाबादमधील या स्टेडीयमला नरेंद्र मोदी स्टेडीयम (Narendra Modi Stadium) म्हणून ओळखले जाईल. मात्र यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची राळ उठवलीये. स्टेडियमला या अगोदर सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांचे नाव होते. त्यामुळे हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान असल्याचं कॉंग्रेसचे नेते म्हणत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातूनसुद्धा यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्यात.

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या नामकरण प्रकरणावरुन मोदींवर कडाडून टीका करत त्यांची तुलना जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्याशी केलीये. जर्मनीचा कृर हुकुमशहा अशी ओळख असणार्‍या हिटलरनेसुद्धा सत्तेवर आल्यानंतर स्वत:चे नाव एका स्टेडीयमला दिले होते. असे ट्वीट त्यांनी केलंय.

ते म्हणाले, “स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले… हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते.”

कॉंग्रेसकडून सातत्याने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायेत. दरम्यान अशातच गुजरात कॉंग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनीसुद्धा या नामकरणावर टीका केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निर्बंध आणले होते. त्यामुळेच संघाचे लोकं पटेलांचं नाव मिटवण्याच्या प्रयत्नांत आहे. असे ट्वीट हार्दिक पटेल यांनी केले.

तर मरणोत्तर आपले नाव कुणी विसरु नये या भावनेतून पंतप्रधानांनी हे नामकरण केले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे असे स्टेडीयम निर्माण करण्यात आले आहे. मंगळवार (दि. २३ फेबृ.) या स्टेडीयमवर भारत विरुद्ध ईंग्लण्ड कसोटी सामन्यास सुरुवात झाली. याअगोदर या स्टेडीयमचे ऊद्घाटन करुन यांस नरेंद्र मोदी स्टेडीयम असे नाव देण्यात आले.

तर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीवरुन चांगलंच वातारण तापलंय, ममता बॅनर्जी यांनी मोदींवर सडकून टिका केलीये. हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे खोटेपणा आणि विद्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तृणमूल पक्षात महिलांना सन्मान दिला जातो. आईप्रमाणे वागणूक दिली जाते. आपल्या राज्यात शांतता आहे, कारण आपली पश्‍चिम बंगालची भूमि ही माता-भगिनींची आहे. गुजरात बंगालवर नियंत्रण मिळवू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीच्या सीबीआय चौकशीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, ही चौकशी महिलांचा अपमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केली.

हिंसेने काहीच साध्य होत नाही. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगलखोर आहेत. ट्रम्प यांचे काय झाले. त्यांचे (मोदीं) यापेक्षाही अधिक हाल होतील.अस ही त्या बोलताना म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER