मानव जातीला जेरीस आणणाऱ्या ‘मलेरियाचा’ काय इतिहास?

Maharashtra Today

भारतासह जगभराला कोरोना विषाणूनं विळख्यात घेतलंय. अनेक राष्ट्रांनी यावर मात केलीये तर काही राष्ट्रांचे कोरोनाला(Corona) वेसण घालण्याचे प्रयत्न सुरुयेत. अशातच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल का? असे प्रश्न विचारले जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्ययंत्रणेवर मोठा भार पडवल्याचं दिसतंय. अशातच पावसाळ्याच्या दिवसात साथीच्या इतर रोगांपासून संरक्षण व्यावे याची दक्षता घेणं ही गरजेचं असल्याचं बोललं जातंय. पावसाळ्यात डासांपासून असा फोफावणारा मलेरिया (Malaria)हा रोग.

जगभरातील गंभीर आजारांच्या यादीत सामाविष्ट असणारा ‘मलेरिया’ या रोगामुळं दरवर्षी अनेकांना प्राणाला मुकावं लागतं. डासांमुळे हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो. उष्ण हवामानात जिथं पाऊस सुरु असतो तिथं मलेरिया नावाचा आजार हात पाय पसरतो. याचे वहन करण्याचे काम डास करताना दिसतात. सद्यस्थितीला उपलबद्ध असलेल्या माहितीनूसार १०३ राष्ट्रांपैकी ५९ राष्ट्रांना मलेरियाचा सामना गांभीर्याने करावा लागतोय. जगभरातल्या १०३ देशात मलेरियाचे प्रसाराचे प्रमाण जास्त आहे.

सहारा वाळवंटातल्या उपविभागात जगभरातील मलेरिया रुग्णातील ९० टक्के संख्या आढळते. दरवर्षी अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या राष्ट्रात सुमारे हजार ते दिड हजारपर्यंत मलेरियाबाधित रुग्ण दरवर्षी आढळतात. गर्भवती महिलांना मलेरियाचा सर्वाधिक धोका असल्याचं अनेक अहवालातून स्पष्ट होतं.

ख्रिस्तपुर्व काळापासून रोग आहे प्रचलित

मलेरिया आजाराचा इतिहास फार जूना आहे. प्लाझमोडियम’ या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले. इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.

दुषित हवेमुळे मलेरिया होत नाही हे चार्ल्स यांनी जगासमोर मांडलं

मलेरिया रोगाबद्दल अनेक समजुती गैरसमजुती दिसून आधीच्या काळात होत्या. दुषित हवेमुळे मलेरिया होतो असं आधी मानलं जायचं. त्यामुळं त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होतं. इसवी सन १८५१ मध्ये चार्ल्स इ. जॉन्सन ह्या शास्त्रज्ञाने मलेरिया हा दूषित हवेमुळे होत नाही हा मुद्दा सर्वप्रथम जगासमोर मांडला. त्यानंतर १८८० मध्ये चार्ल्स लुई आफ़ॉन्स लाव्हरां ह्या फ्रेंच शास्त्रज्ञाने अल्जीरियाच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मलेरियाने ग्रस्त मनुष्याच्या रक्तपेशींमध्ये एक काळपट ठिपका पाहिला. आणि मलेरियाची लागण एका परजीवीमुळे होते हे त्याने सर्वप्रथम मांडले. (पण शरीरात हा परजीवी कुठून आणि कसा येतो हे स्पष्ट नव्हते) ह्या आजाराला मलेरिया असे संबोधण्याबाबत लाव्हरांचा तीव्र आक्षेप होता. त्याच्या म्हणण्यानुसार तो शब्द अशास्त्रीय असल्याने त्याने ‘पालदिस्म’ हे नाव दिले.

आजही फ्रान्समध्ये ह्याच नावाचा वापर केला जातो. पण गंमत अशी आहे की आज जर आपण पालदिस्म ह्या शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये शोधायला गेलो तर मलेरिया असाच मिळतो. नंतर १८९७ मध्ये रोनाल्ड रॉस ह्या ब्रिटिश डॉक्टरने डास हे मलेरियाचे वाहक आहेत ह्याचे निश्चित पुरावे दिले. आणि त्याबरोबरच डासाच्या पोटातील मलेरियाच्या परजीवीचे जीवनचक्रही शोधून काढले. हा लेख रोनाल्ड रॉस आणि त्यांनी केलेले मलेरियाविषयी संशोधन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button