शिवसेना आणि सचिन वझेंबाबत मनसेचे ट्विट, यांचे संबंध काय ?

What is the connection between MNS tweets about Shiv Sena and Sachin Vazhen

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावरुन वादळ निर्माण झालेले असताना ज्या गाडीत स्फोटकं होती त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचे शव काळ खाडीत आढळले. त्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे (Sachin Vazhen) याचे नाव आले आहे. मात्र, सचिन वझे यांचे नाव पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाही. याआधी त्यांचे नाव चर्चेत आले आहे ते शिवसेनेशी असलेल्या संबंधांमुळे !

यावरून मनसेचे नेते सचिन देशपांडे यांनी ट्विट केले – सचिन वझे ह्यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???

सचिन वझे आणि शिवसेना

सचिन वझे १९९० मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात आलेत. ‘ एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी ६३ एन्काऊंटर केले आहेत.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचे नेतृत्व सचिन वझे यांनी केले होते. शिवसेनेचे अर्णब गोस्वामी यांच्याशी शत्रुत्व आहे.

सचिन वझे यांनी २००७ ला नोकरीचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर १३ वर्षांनी, ६ जून २०२० ला ते पुन्हा पोलिससेवेत दाखल झालेत.

वझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.

सचिन वझेंसह १४ पोलिस कर्मचाऱ्यांना २००४ मध्ये निलंबित करण्यात आले होते. या सर्वांवर २००२ घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.

निलंबन संपल्यानंतर नाराज होत त्यांनी २००७ मध्ये पोलिस दलाचा राजीनामा दिला.

२०२० मध्ये कोरोना साथीच्या काळात सचिन वझे पुन्हा पोलिस दलात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER