प्रभु श्रीरामाच्या आयोध्या नगरीचा आणि दक्षिण कोरयाचा काय आहे संबंध?

Maharashtra Today

शंभरहून जास्तवर्ष विवाद असणाऱ्या रामजन्मभुमीचा वाद निकालात निघाला. मंदिर उभारणीसाठी निधीही उभारला जातोय. संपूर्ण भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रभु राम चरणी(Lord Rama’s city of Ayodhya ) नतमस्तक व्हायला देशभरातील लोक आयोध्येत येत असतात. वर्षभर अनेकांची आयोध्यावारी सुरु असते. पण रामाचा महिमा फक्त भारतापुरता मर्यादित नाही. अनेक देशांमध्ये रामाची पुजा केली जाते. म्यानमार, थायलंड, दक्षिण कोरीया या देशातल्या राहणाऱ्यांच्या पुर्वजांनी प्रभु श्रीरामचंद्राशी स्वतःला जोडून घेतलंय. या देशातल्या पुराणकथांमध्ये रामाच्या महिमेचा उल्लेख आढळतो. पण दक्षिण कोरयातल्या लोकांना आयोध्येविषयी असणारी ओढ ही रामामुळं नाही तर एका महाराणीमुळं आहे. त्यांच्या देशाच्या महाराणीला अभिवादन करायला हे लोक आयोध्येला येतात.

उत्तर प्रदेशच्या आयोध्या शहरात दरवर्षी अनेक दक्षिण कोरियाचे नागरिक येतात, लग्नाची आधी दक्षिण कोरीयाची महाराणी आयोध्येची राजकुमारी होती. त्यांच नाव ‘सुरीरत्न'(Suriratna) होतं. त्यांचा विवाह दक्षिण कोरीयाच्या करक वंशातील राजा किम सुरो यांच्याशी इसवी सन ४८ साली झाली होता. कोरीयाच्याजहाजात बसून त्या कोरियाला पोहचल्या. गेमग्वान गयाचा राजा सुरो याची त्या राणी बनल्या. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. त्या गया साम्राज्याच्या पहिल्या महाराणी होत्या.

करक वंशाचे ६० लाख लोक आयोध्येला महाराणीचं माहेर मानतात. म्हणून दरवर्षी महाराणीच्या स्मारकाचं दर्शन घ्यायला आयोध्येला येतात. या स्मारकाचं लोकार्पण २००१ साली करण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही देशातले इतिहासप्रेमी, दोन्ही राष्ट्रांचे प्रतिनिधी इतकच नाही तर उत्तर कोरीयाचे राजदूत देखील उपस्थीत होते. किम्हे किम वंश, हुर वंस आणि इंचेऑन वंशाच्या ७० लाख लोकांनी आपला इतिहास शोधला आणि स्वतःला आयोध्येशी जोडून घेतलं.

साउथ कोरीयामध्ये महाराणीची समाधी ‘किम्हे’ या ठिकाणी महाराणीची समाधी आहे. त्यांच्या समोर पगोडा दगडही ठेवण्यात आलाय. हा दगड राणीनं आयोध्येतून आणला होता अशी मान्यता आहे. राणीच्या माता पित्याला स्वप्ना येऊन देवानं साक्षात्कार दिला होता की “दक्षिण कोरियाच्या राजाचं लग्न झालेलं नाहीये. तुमची मुलगी त्याच्या विवाहासाठी पाठवून द्या.” देवाज्ञेला अंतिम मानून त्यांनी मुलीचा कोरियाला पाठवलं. सुरीरत्ना दक्षिण कोरियाला गेल्या. राजाशी विवाह केला. कार्यकुशलतेनं राज्याचं नेतृत्व केलं. त्यांच्या नावानं अनेक लोककथा, गीतं प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे अंगभूत नेतृत्व गुण होतं असंही अनेक इतिहासकार मानतात. अशा या प्रजेच्या लाडक्या, गुणसंपन्न राणीचा वयाच्या १५७ व्या वर्षी मृत्यू झाला.

मोदींनी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असातना या महाराणीचं मोठं स्मारक उभारणीसाठी हिरवा कंदिल दाखवला होता. दक्षिण कोरीया आणि भारत सरकरा दोघांच्या संयुक्तविद्यमानं स्मारक उभारणी होणार असल्याचा करार करण्यात आलाय. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्मारकाची उभारणी कोरियन पद्धतीनं होणार असल्याचं सांगितलं होतं. सेंट्रल कर वंश सोसायटीचे अध्यक्ष किम की-जे यांना विनंती केली होती की त्यांनी डीझाईन पाठवावं.

करक वंशाचा इतिहास

कोरियात किम अडनावाचे बरेच लोक आहेत. राज किम सुरोला किम साम्राज्याचा जनक मानलं जातं. कोरियामध्ये वडीलांच अडनाव लावण्याची आधीपासून प्रथा होती. यावर राणी नाराज झाली. राणीचं अडनाव मुलं का लाऊ शकत नाहीत याचं त्यांना दुःख झालं होतं. यानंतर राजानं त्याच्या दोन्ही मुलांना हियो हे अडनाव लावण्याची परवानगी दिली. यानंतर साउथ कोरियात ही प्रथाच सुरु झाली.

आज कोरियात कारक गोत्राचे तब्बल साठ लाख लोक स्वतःला राजा सुरो आणि आयोध्याची राजकुमारीचे वंशज मानतात. दक्षिण कोरियातली बहूतांश लोकांना यावर विश्वास आहे.

दक्षिण कोरीयाचे माजी राष्ट्रपती किम डेई जंग आणि माजी पंतप्रधान हियो जियोंग आणि जोंग पिल- किम याचं वंशातून होते. यावंशातील लोकांनी ते दगडही सांभाळून ठेवलेत जे दगड राणी समुद्र यात्रा करताना जहाजाचं संतूलन बनवण्यासाठी घेऊन आली होती. या दगाडांना ‘पगोडा’ देखील म्हणलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button