राज्यमंत्र्याला अधिकार काय ? अब्दुल सत्तार काहीही बोलतो; नारायण राणेंची टीका

Rane-Sattar

सिंधुदुर्ग :- महसूल राज्यमंत्र्याला काय अधिकार आहेत? अब्दुल सत्तार काहीही बोलतो, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ना. सत्तार यांनी कोकणच्या दोऱ्यात केलेल्या केलेल्या घोषणांवर केली.

अब्दुल सत्तार यांनी कोकणचा दौरा करून निकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आज (३ नोव्हेंबरला) याबाबत सिंधुदुर्ग येथे पत्रपरिषद घेतली. यावर राणेंनी टीका केली.

ते म्हणाले – राज्याचा महसूलमंत्री काँग्रेसचा आणि राज्यमंत्री शिवसेनेचा, कोण विचारते? काहीही बोलतो. सत्तारांना मी गेल्या चाळीस वर्षांपासून ओळखतो. ते अगोदर अशोक चव्हाण यांच्याबरोबर फिरायचे.

ठाकरेंना वाटते भीती

शिनसेनेचे १४५ आमदार निवडून आले म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यांना, लोक तुमचे किती आमदार निवडून आले? असा प्रश्न विचारतील अशी भीती वाटते म्हणून ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, असाईओंना राणेंनी मारला.

ते म्हणाले, शिवसेनेचे फक्त ५६ आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी कोकणातील अकराही आमदाराना घरी बसवणार आहोत. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करू.

कोकणातील ११ आमदार विधानसभेत कोकणातील विकासासंदर्भात बोलतात का? जाहीर केलेला फंडही सरकार देत नाहीत. त्यामुळे आमदार काहीही करू शकत नाही. पालकमंत्री तर निष्क्रीय आहे. काही कामाचे नाहीत. जिल्ह्यात येऊन काय करतात हे एक दिवस सांगेन. शिवसेनेचे आमदार विधानसभेत नाही बोलले तरी कोकणाचा विकास थांबवायचा नाही हे आम्ही ठरवले आहे. कोकणातील विकासाला चालना मिळालीच पाहिजे. त्यासाठी भाजपा आंदोलन करेल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : प्रसिद्धीसाठी पुड्या सोडतात; अब्दुल सत्तार यांचा राणेंना टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER