लॉकडाऊनला पर्याय काय? पंकजा मुंडेंचे लॉकडाऊनला समर्थन

Pankaja Munde

मुंबई :- कोरोनाचा (Corona) वाढत असलेला प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचे (Lockdown) संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिली. मात्र लॉकडाऊन लावताना आधी लोकांचा विचार करा, हातावर पोट असणाऱ्यांसाठी एखादं पॅकेज जाहीर करा, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र सरकारच्या भूमिकेचे  समर्थन केले आहे.

‘लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाऱ्यांची, आर्थिक परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे? कोरोनाची साखळी कशी तोडणार? मजूर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणावरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.’ असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. एकीकडे भाजपने लॉकडाऊन करायचा असेल तर आधी गरीब जनता, व्यापारी, छोटे व्यावसायिक, हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही ठोस भूमिका घ्या, पॅकेज जाहीर करा, अशी मागणी केली आहे. तरच भाजप लॉकडाऊनबाबत सकारात्मक विचार करेल, असं देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मात्र पंकजा मुंडे यांनी लॉकडाऊनचे समर्थन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button