… जे तुम्हाला शक्य झाल नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही : निलेश राणे

- बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना उद्धव ठाकरेंना मारला टोमणा

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज ८ वा स्मृतीदिन आहे. शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथे जागा घेण्यात आली आहे. परंतु अद्याप स्मारक उभारण्यात आल नाही. यावरून मनसेने सरकारवर टीका केली होती. भाजपा नेते निलेश राणे यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना उद्धव ठाकरे यांना, तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही, असा टोमणा मारला.

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट केले – “बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात. पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरलेलं नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे. पण, जे तुम्हाला शक्य झाल नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!”

दरम्यान, करोनाच्या साथीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे की, गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या.

मनसेची टीका

बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील जागा घेण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आल नाही. यावरून मनसेचे संदीप देशपांडे यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे – “स्मारक की मातोश्री ३?”

“महापौर बंगला घेऊन आता तीन वर्ष होत आली. परंतु हा बंगला अजूनही बंदिस्तच आहे. २३ जानेवारी किंवा १७ नोव्हेंबर आलंतर निविदा काढल्यात, काम सुरू आहे इतक्याच बातम्या आम्हाला पाहायला मिळतात. खरोखर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक असेल तर ते बंदिस्त का आहे. जनेसाठी का खुल नाही? जनतेला त्या ठिकाणी का जाता येत नाही?, कोणाची खासगी मालमत्ता असल्यासारख ते का वापरल जाते ?” असे देहशपान्डे यांनी विचारले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER