महेंद्रसिंग धोनीचे ‘नंबर-७ कनेक्शन’ काय आहे ? त्याचे कारण जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे ७ क्रमांकाशी खोल संबंध आहे, तो या क्रमांकाला अत्यंत भाग्यवान मानतो आणि या क्रमांकसह तोही खूप यशस्वी झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या संघासाठी शानदार कामगिरी करून जगात ओळख निर्माण केली आहे. टीम इंडियाच्या विजयात धोनीने अनेक महत्त्वाचे योगदान दिले आहेत  हे आपल्या सर्वांना माहिती आहे. धोनी केवळ उत्कृष्ट खेळाडूच नाही तर तो एक महान कर्णधारही होता. आज धोनी बऱ्याच काळापासून मैदानाबाहेर असूनही, त्याच्याबद्दल असलेले प्रेम आणि आदर त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये कमी झालेला नाही. त्याचबरोबर, आपल्या सर्वांना हे माहीत आहे की, धोनीचा जर्सी क्रमांक ७ आहे. त्या क्रमांकामागील त्याचे खोल संबंध आहेत. आज तुम्हाला धोनी आणि त्याचा ७ क्रमांक या संबंधाबद्दल सांगणार आहोत, हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

जगातील प्रसिद्ध ‘कॅप्टन कूल’ हे विशेषण असलेला महेंद्रसिंग धोनी ७ क्रमांकाला  भाग्यवान क्रमांक मानतो. त्यातील सर्वांत मोठे कारण म्हणजे धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजीचा. जन्मतारीख ७ आणि महिनादेखील ७ वा आहे. ‘कॅप्टन कूल’चा  न्यूमेरोलॉजीवर खूप विश्वास,  त्याने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते.

या मुलाखतीत एक किस्सा सांगताना धोनी म्हणाला की, एकदा त्याला एका मोठ्या स्मार्टफोन कंपनीबरोबर करार करायचा होता, ज्यासाठी धोनीने आधीपासूनच कंपनीशी बोलले होते की, तो या कंपनीबरोबर फक्त ७ डिसेंबरलाच करार करेल. येथे हे प्रकरण फक्त ७ तारखेपुरते मर्यादित नव्हते. या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांनी स्मार्टफोन कंपनीला स्पष्टपणे सांगितले की, ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता आणि ७ वर्षांसाठी करार करणार आहे.

ही बातमी पण वाचा : या अभिनेत्रीचे होते धोनीवर प्रेम, आजही होतो तिला या गोष्टीचा पश्चाताप

७ वर्षांसाठी कोणत्याही कंपनीबरोबर करार करणे ही मोठी गोष्ट आहे; कारण त्याआधी कोणत्याही खेळाडूने कोणत्याही कंपनीशी इतक्या वर्षांसाठी करार केला नव्हता; परंतु कोणीही जे करू शकत नाही ते धोनी करून दाखवतो, हेच माहीचे वैशिष्ट्य आहे. धोनीचे ७ क्रमांकासाठी इतके वेडेपण पाहून तुम्ही असा विचार केला असेल की, स्वतः धोनीने टीम इंडियाच्या निळ्या जर्सीवर ७ क्रमांक घेतला असेल; पण हे खरे नाही. धोनीने  एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. तो म्हणाला, ‘मला जर्सीवर ७ क्रमांक नशिबाने मिळाला; कारण त्यावेळी मला मिळालेला हा एकमेव नंबर रिकामा होता.’

त्यानंतर तो नेहमीच समान क्रमांकाची जर्सी घालतो, मग तो राष्ट्रीय संघात खेळत असेल किंवा त्याचा आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असेल. त्याचा जर्सी क्रमांक त्याच्यासाठी तसेच संपूर्ण संघासाठी खूप भाग्यवान ठरला. म्हणूनच धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००७ मध्ये पहिला टी -२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER