सिनेमातलं कास्टिंग म्हणजे काय असतं?

Rohan Mapuskar

आजवर अनेक उत्तम आणि दर्जेदार चित्रपट मराठी सिने सृष्टीत घडले आहेत. एखादा चित्रपट येतो मग त्याला अनेक पुरस्कार देखील मिळतात पण या मागे अनेक लोकांची मेहनत असते. अगदी दिग्दर्शक , निर्माते , कलाकार , टेक्निकल टीम आणि अगदी संपूर्ण चित्रपटाची टीम या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग असतात. चित्रपट कसा घडतो त्यातल्या कलाकाराचं कास्टिंग कसं होत आणि अश्या अनेक गोष्टी बद्दल जाणून घेऊ या कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांच्या कडून.

” योग्य कास्टिंग करणं आव्हानात्मक “

चित्रपट असो किंवा मालिका मधेल चेहेरे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतात पण या काळकरांच  योग्य कास्टिंग करणारा एक मराठमोळा डिरेक्टर आहे ते म्हणजे ” रोहन मापुस्कर ” आजवर अनेक दिगग्ज चित्रपटाचं कास्टिंग करणारे कास्टिंग डिरेक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. ” थ्री ईडियट्स , हाफ तिकीट जंगी फौज असलेला व्हेंटिलेटर , ठाकरे , फेरारी की सवारी , काळे धंदे ( वेब सीरिज ) आणि बॉलीवूड चा गाजलेला पानिपत ” अश्या कित्येक चित्रपटाचं योग्य रिते त्यानी कास्टिंग केलंय. प्रत्येक सिनेमातील कलाकारांची योग्य निवड करण्यासाठी त्यांना अनेक निकष डोळ्यासमोर ठेवावे लागतात. कास्टिंग करण्याची ही एक अनोखी प्रोसेस आहे.

” बारकाईनं कास्टिंग करतो “

मालिका , चित्रपट किंवा वेब सीरिज अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात कास्टिंग करताना खूप आव्हानाच काम आहे. एखाद्या व्यक्तिरेखेचं अगदी बारकाईनं कास्टिंग करावं लागतं. कास्टिंग करताना त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू लक्षात घेऊन मग योग्य त्या व्यक्तिरेखेला साजेसा चेहरा शोधण हे काम करणं थोडं फार आव्हानाचं असत. काही वर्षांपूर्वी मी स्वतःचा कास्टिंग स्टुडिओ सुरू केला हा स्टुडिओ म्हणजे नव्या कलाकारांसाठी आणि अनेक प्रतिभावंत लोकांसाठी एक संधी आहे. आपल्या मराठी मातीत अशी अनेक उत्तम कलाकारी मंडळी आहेत ज्यांना जगासमोर घेऊन येण्याची गरज आहे. मराठी इंडस्ट्रीत कास्टिंग ला एक वेगळं स्थान निर्माण व्हाव हा माझा नेहमीच प्रयन्त असतो. आता कलाकार , निर्माते , दिग्दर्शक यांच्या सोबतीने ” कास्टिंग डिरेक्टर ” हा देखील चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे असं म्हणायला हरकत नाही.

” योग्य भूमिका निवडण्यासाठी अभ्यास करावा लागतो “

ठाकरे सिनेमासाठी कास्टिंग करताना नक्कीच अनुभव फार वेगळा होता कारण माझ्या आयुष्यातील हा पहिलाच बायोपिक होता ज्यासाठी मला कास्टिंग करायच होत. ठाकरे च्या कास्टिंग साठी खूप अभ्यासपूर्ण तयारी करून प्रत्येक भूमिकेसाठी योग्य कास्टिंग करावं लागलं. या कास्टिंग साठी मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रातील काळकरांचा विचार करण्यात आला आणि मग खूप चर्चा , स्केचेस करून योग्य व्यक्तीरेखेसाठी कास्टिंग केलं गेलंय. असाच काहीसा अनुभव पानिपत करताना देखील आला आहे. पानिपत च्या कास्टिंग ची जवाबदारी जेव्हा माझ्यावर आली तेव्हा प्रत्येक भूमिकेला साजेस असं कास्टिंग करण्याची जिकरीच काम माझ्यावर होत. या चित्रपटात मराठी आणि हिंदी कलाकार आहेत तर यातलं कास्टिंग करण्याची सगळी प्रोसेस ही नक्कीच वेगळी होती.

कोणत्याही चित्रपटासाठी योग्य कास्टिंग करण्यासाठी प्रत्येक भूमिका आधी मला समजून घेऊन त्या भूमिकेच्या जवळ्पास कोणत्या कलाकाराचा चेहरा मॅच होतोय हे बघावं लागत मग या साठी अनेक लूक टेस्ट होतात , त्यावर अभ्यास केला जातो आणि मग हे काम पूर्ण केलं जातं. ठाकरे सिनेमाच्या कास्टिंग साठी जवळपास साडेतीन ते चार महिने गेले कारण या सिनेमात अनेक व्यक्तिरेखा आहेत. कधीकधी काही चेहरे हे आपल्या आसपास असतात ते पटकन मिळून देखील जातात पण केव्हा तरी खूप विचाराने कलाकार शोधावे लागतात. प्रत्येक व्यक्तीरेखेचे काही ठोकताळे असतात त्या नुसार कास्टिंग केलं जातं.

रोहन मापुस्करांनी आजवर अनेक बड्या सिनेमासाठी कास्टिंग केलंय. मराठी इंडस्ट्री मधला आघाडीचा कास्टिंग डिरेक्टर असं त्यांना म्हंटल जात. त्यांचे अनेक आगामी प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER