जे भाजपच्या पोटात ते कंगनाच्या मुखात – काँग्रेस

Nitin Raut - Balasaheb Thorat - PM Narendra Modi - Kangana Ranaut

मुंबई : सुशांतसिंह (Sushant Singh Rajput) आत्महत्या चोकशी प्रकरणात कंगनाने (Kangana Ranaut) घेतलेला स्टॅंड ते सुशांतच्या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांच्या नावाचा उल्लेख यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळतच गेले. आता या प्रकरणात कंगना विरुद्ध शिवसेना (Shiv Sena), बॉलिवूड (Bollywood) आणि मुंबई (Mumbai) असा संबंध जुडल्याने आणि मुंबई विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अनेकांनी कंगनाला चांगलेच खडे बोल सुनावले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसनेही जे भाजपच्या पोटात ते कंगनाच्या मुखात असल्याचे म्हटले आहे. कंगनाच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांची चुप्पी किंवा भाजप नेत्यांचे समर्थनार्थ बोल यावरून कॉंग्रेसने (Congress) भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

कंगनाला पुढे करुन मुंबई पोलीस, मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जनता कदापी माफ करणार नाही”, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संताप व्यक्त केला आहे (Balasaheb Thorat on Kangana Ranaut).

“बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला , हे महाराष्ट्रातील जनता जाणते. महाराष्ट्र विकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत”, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

तसेच, “ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना रनौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आहे. हा महाराष्ट्रातील 13 कोटी मराठी माणसांचा अपमान असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

थोरातांपुर्वी कॉंग्रेसचे नेते नितीन राऊत यांनीही कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. “कंगना रानौत म्हणते, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते. अभिनयाच्या क्षेत्रात ‘रन-आउट’ होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला?”, असा प्रश्न मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरवर विचारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER