‘मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे’?, भाजपचा टोला

Maharashtra Today

मुंबई : मुंबईतील कोरोना (Corona)मृत्यूची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करुन कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवला जात आहे. कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर केला होता. त्यानंतर आता प्रवीण दरेकर(Praveen Darekar) यांनीही मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्याला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेनं(Shivsena) दिला, अशा शब्दात दरेकरांनी जोरदार टोला लगावला.

‘आरटीपीसीआर चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर २३.४३ टक्के पर्यंत कसा गेला, हे मान्य करता मग मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून ११.२३ टक्के आणि एप्रिलमध्ये १८.०६ टक्के पर्यंत गेला, ही माहिती का लपवून ठेवता? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे? आरटीपीसीआर चाचण्या कमी करून संसर्ग दर कमी दाखविले जात असल्यासंदर्भात तसेच #Covid19 मुळे झालेले मृत्यू अन्य कारणांमुळे झाले असल्याची नोंद होत आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अनियमितता आपल्या पत्रात तारखा, उदाहरणांसह उघड केली. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महापालिकेनं आणखी संशय वाढवला’, असं ट्वीट दरेकरांनी केलं.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button