तुम्ही ७० वर्षांत काय केले? हिशोब आणला का, अमित शहा यांचा काँग्रेसला प्रश्न

Amit Shah - Congress

नवी दिल्ली :- आज लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ पारित करण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ चा जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी काहीही संबंध नाही योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येईल, असे अमित शाह (Amit Shah) म्हणालेत.

शाह म्हणालेत, आता विचारण्यात आले की, कलम ३७० हटवल्यानंतर जी आश्वासने दिली त्यासाठी काय केले. कलम ३७० हटवून १७ महिने झाले आहेत आणि तुम्ही आमच्याकडून हिशेब मागत आहात. तुम्ही ७० वर्षांत काय केले याचा हिशेब आणला का? ७० वर्षे योग्यरित्या चालला असता, तर आमच्याकडून हिशेब मागायची वेळ आली नसती.

ज्यांना पिढ्यानपिढ्या शासन करण्याची संधी मिळाली त्यांनी स्वत:कडे पाहून ठरवावं की, आपण हिशेब मागण्याच्या लायक आहोत का? असा टोमणा शाह यांनी काँग्रेसला मारला.

ही बातमी पण वाचा : अमित शहा तर निघून गेलेत पण, सिंधुदुर्गात राणे – शिवसेना वाद पेटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER