पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय झाले? पोलिसही हप्ते घेतात! – भास्कर जाधव

Bhaskar Jadhav

मुंबई : लॉकडाऊन (Lockdown) मध्ये बेकायदा दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे (Shivsena) उप तालुका प्रमुख बाबू सावंत (Babu Sawant) यांच्यावर कारवाई केली होती. जाहीर सभेत त्यांचा बचाव करताना शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले – पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय झाले? पोलिसही हप्ते घेतात!

या निमित्ताने जाधव यांनी भाजपालाही टोमणे मारले. म्हणालेत, भाजपाच्या नेत्याने सुरुची झाडे तोडून नेली तर त्याची साधी बातमी नाही आणि शिवसैनिकाने बेकायदा दारु विकली त्याचा फोटो छापला जातो, काही काळजी करू नको, मी तुमच्या पाठीशी आहे.

भाजपावर टीका करताना ते म्हणाले, ज्यांच्याशी मैत्री करायची त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भाजपची जुनीच परंपरा आहे. ही परंपरा भाजप नेहमीच पाळत आली आहे. युती असूनही विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला कसा दगा दिला हे भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER