भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीचे काय झाले : नाना पटोले

Devendra Fadnavis & Nana Patole

मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहण्यास मिळाला. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशी झाल्यानंतर ‘एनआयए’कडे का सोपवला, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. गुन्हेगारी प्रकरणावरून फडणवीस यांनी राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

“मागील सरकारमध्ये कामगार कल्याणचे अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. महिलांना धमकावणे या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. यादववर गुन्हे दाखल होऊ नये, यावर कोणाचा दबाव आहे, हे गृहमंत्र्यांनी शोधून काढले पाहिजे. धनंयज मुंडे (Dhananjay Munde) यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा फोन तपासल्यास सगळी माहिती कळेल, असे बोलले होते. याबद्दल चौकशी केली पाहिजे.” असा टोला नाना पटोले यांनी फडणवीसांना लगावला.

३३ कोटी वृक्षांच्या चौकशीची मागणी झाली आणि मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली, असा टोला पटोले यांनी लगावला. “मध्यप्रदेशात व्यापम घोटाळा झाला. या घोटाळ्यात अनेक जणांनी आत्महत्या केली. याबद्दल काय तपास झाले, कुणाचा हात होता. याची माहिती काही कळू शकली नाही, असाच घोटाळा मेगाभरतीमध्ये झाला, महाऑनलाईन कुणाची होती, जे मेरिट होते, त्यांचे अधिकार डावलण्यात आले, ऑनलाईन मेगाभरती कोण चालवत होते, याची माहिती समोर आली पाहिजे. व्यापमपेक्षाही हा मोठा घोटाळा आहे.” असा आरोपही पटोले यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER