सुजय विखेंनी विमानातून आणलेल्या बॉक्समध्ये काय होतं? रुपाली चाकणकरांची शंका

Sujay Vikhe Patil - Rupali Chakankar

मुंबई :- भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी खास विमानाने नगरसाठी तब्बल दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणले होते. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी शंका व्यक्त केली .

चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिवीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी, असं आव्हानच चाकणकर यांनी दिलं आहे. त्यामुळे सुजय यांनी आणलेल्या बॉक्समध्ये खरोखरच इंजेक्शन होते का? सुजय विखेंनी व्हायरल केलेला व्हिडीओ खरा होता का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button