
मुंबई : 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते 2019 मध्ये भाजपचं (BJP) झालं. त्यातून सेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आलं. ‘दाल मे काला है इधरसे निकलो’. असे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, यातून सेना वाचली कारण त्यांच्या पटकन लक्षात आलं. ‘दाल मे काला है इधरसे निकलो’. उध्दव ठाकरेंनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. केंद्र सरकार सव्वा वर्षात कुठलीही टीका करु शकले नाही कारण ते जेव्हा खाली बोलतात तेव्हा त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी महाराष्ट्रात उत्तर देते. त्यामुळे प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे असे सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले त्या नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मेळाव्यात बोलत होत्या.
गेलात तिकडे सुखात राहा, इकडे माती करायला येऊ नका –
यावेळी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून गेलेल्यांनाही चांगलीच तंबी दिली. त्या म्हणाल्या, आधी दररोज कोण पक्ष सोडून जातंय याची काळजी होती. मात्र, हे लोक तिकडं गेली ते बरं झालं असं वाटतंय. गेलात तिकडे सुखात राहा, इकडं माती करायला येऊ नका,”
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “काही भाजपच्या लोकांच्या मनातही तसं आहे. त्यांनाही भाजपची सत्ता गेल्यानं बरं वाटतंय. हे सर्व इनकमिंग सुरु केलं आणि त्या इनकमिंगमुळेच आमची सगळी माती झाली आमच्या पक्षाची असंच ते म्हणत आहेत. काही लोकांमध्ये गुण असतात ते कुठेही गेले तरी ते तसंच होतं. त्यामुळे मला तर बरं वाटतं की बरीच लोकं तिकडं गेली. माझं म्हणणं आहे आता गेलाय ना तिथेच गुणाने राहा, परत माती करायला इकडे येऊ नका.”
शरद पवारांनीही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती मात्र ते लालदिव्यासाठी नाही –
पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं. 52 लोक शरद पवारांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ही बातमी पण वाचा : गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, सुप्रिया सुळे यांची मागणी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला