हे काय झाले कपिल शर्माला?

गेल्या महिन्यात पुन्हा सुरु करण्यात आलेला परंतु प्रेक्षकांच्या प्रतिसादाविना कपिल शर्मा (Kapil Sharma) शो रंगत नसल्याने तो नुकताच बंद करण्यात आला. खरे तर लॉकडाऊनमध्ये सगळेच शूटिंग बंद होते तसेच कपिल शर्माच्या शो चेही शूटिंग बंद होते. लॉकडाऊन उठल्यानंतर मात्र कपिल शर्माने कोरोनाचे नियम पाळत स्टुडियोत प्रेक्षकांना न बोलावता त्यांचे कटआऊट लाऊन शो सुरु केला होता. पण शो रंगत नसल्याने तो बंद करण्यात आला. शो बंद झाल्यानंतर कपिल शर्माने पुन्हा नव्या रुपात शो आणणार असल्याचे सांगितले होते आणि ही माहिती आम्ही तुम्हाला दिलीही होती.

त्यावेळी शोमधील एक कलाकार भारती सिंहनेही (Bharti Singh) शोबाबत बोलताना सांगितले होतेस ‘हो, आम्ही ब्रेवर जात आहोत. काही तरी नवे करून दाखवण्यासाठी आम्ही ब्रेक घेत आहोत. आमची संपूर्ण टीम नव्या कॅरेक्टरवर काम करण्यासाठी उत्सुक आहे. पुढील दोन महिन्यात मोठे सिनेमे रिलीज होत नसल्याने चॅनेलने आम्हाला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळे सुट्टीवर जाणार आहोत. या दोन महिन्यात आम्ही शोच्या नव्या रुपाबाबत बैठका घेऊन चर्चा करणार आहोत असेही भारतीने सांगितले होते. कपिल शर्मानेही तो लवकरच नेटफ्लिक्स वर येणार असल्याचे जाहीर केले होते.

कपिल शर्मा नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याच्या पत्नीने याच महिन्यात एका मुलाला जन्म दिला. त्याला अगोदर एक मुलगीही आहे. सोमवारी कपिल शर्मा मुंबई एअरपोर्टवर दिसला. तेव्हा त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुले असतील असे वाटले होते. परंतु कपिल शर्माचे ज्या रुपात दर्शन झाले त्याने धक्काच बसला. कपिल शर्मा चक्क एका व्हीलचेअर वर बसला होता आणि एक माणूस त्याची व्हीलचेअर ढकलून एअरपोर्टमध्ये नेत होता. कपिलला या अवस्थेत पाहून त्याला काय झाले आहे असाच प्रश्न मनात उद्भवला. यावेळी कपिलने काळ्या रंगाचा ट्रॅक सूट घातला होता आणि त्याने सफेद रंगाचा मास्क लावला होता.

त्याला या अवस्थेत पाहून काही जणांनी त्याचे फोटोही काढले. एवढेच नव्हे तर त्याच्याशी त्याच्या या स्थितीबाबत बोलणे करण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे कपिलला नक्की काय झाले आहे असा प्रश्न आता बॉलिवूडमध्येही विचारला जाऊ लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER