सत्तापक्षाचे नेते नाही म्हणून काय झाले विरोधी पक्षनेता तर आहे ; नानां पटोलेंचा फडणवीसांना टोला

nana Patole-Devendra Fadnavis

मुंबई : सत्तापक्षाचे नेते नसले तरी काय झाले विरोधी पक्षनेता तर झाले याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही अशा शब्दांत कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे.

तसेच, आपण पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली असल्याचेही नाना पटोले ट्विटमध्ये म्हणाले आहेत. कॉंग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशभरातील पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. युपीए सरकारच्या काळात पेट्रोल 70 रुपयांवर गेले होते तेव्हा हेच अभिनेते टिव टिव करत आघाडी सरकारवर ताशेरे ओढत होते आता पेट्रोलने शंभरी गाठली तरी हे अभिनेते गप्प का असा सवाल नाना पटोले यांनी केला होता. नानांच्या या ट्विट व्हीडिओ नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना टोला लगावत त्यांचे हे वक्तव्य प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटले होते.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस –

नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा टोला, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER