महाराष्ट्रात जे झाले ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे, जावडेकरांची टीका

Prakash Javdekar-CM Uddhav Thackeray

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘भारत बंद’ (Bharat Bandh)ला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) टीका केली. महाराष्ट्रात जे काही झाले ते शिवसेनेच्या (Shivsena) गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.

आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना जावडेकरांनी कृषी कायद्यांचे भक्कम समर्थन केले. कृषी कायद्यांबाबत ९५ टक्के शेतकऱ्यांना कसलीही समस्या नाही. पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांचा गैरसमज आहे तो आम्ही लवकर दूर करू. पंजाबमध्ये सरकारकडून सर्वात जास्त धान्य खरेदी झाली. मात्र, तेथील शेतकऱ्यांचा हमीभावाविषयी गैरसमज झाला आहे. अनेकदा गैरसमज दूर करायला वेळ लागतो. उद्याच्या बैठकीत सगळे गैरसमज दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात जे काही झाले ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले, जावडेकरांच्या या आरोपाला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कशी कमी होतील, हा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री तेव्हा सिंधुदुर्गात ठाण मांडून बसले होते. ती भाजपची गद्दारी होती की इमानदारी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER