असं काय घडलं ज्यामुळे अडवाणींनी वगळून वाजपेयींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषीत केलं!

Atal bihari vajpaye-Lal Krishna Advani

भाजपात (BJP) आज घडीला मोदी शहांचीजी जोडी आहे बऱ्याचदा त्यांची तुलना अडवाणी (Lal Krishna Advani) – वाजपेयी (Atal bihari vajpayee) या जोडगोळीशी करताना अनेक राजकीय विश्लेषक दिसतात. भारतीय राजकारणाला कलाटणी देणारं ही दोन पात्रं अधुनिक भारताच्या अनेक घटनांना वळण देणारी ठरली. अनेकदा त्यांच्या मैत्रीचे गोडवे गायले जातात. त्यांच्यामधील सामंजस्यपुर्ण राजकारणाला अधोरेखित केलं जातं; पण त्यांच्या मैत्रीला अनेक पदर होते. वाजपेयींनी सुरुवातीच्या काळात अडवाणींना बरोबरीचा दर्जा दिला नाही. राम मंदिरावर त्यांची मतं भिन्न होती. नेहरुंवर दोघांची असणारी मतं ही जाणून घेतल्यानंतर दोन्ही नेतृत्त्वातला फरक आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

सर्वात मोठी रॅली

तीस वर्षांपूर्वाींचा काळ, लालकृष्ण आडवाणी १० वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच वय ६८ झालं होतं. राम मंदिर आंदोलनाला घेऊन त्यांनी देशभरात राजकारण तापवलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची पद्धत कुस बदलत होती. हिंदूत्त्वाच्या नावानं संपूर्ण देश अडवाणींच्या पाठीशी उभा राहिला आणि या गदारोळात ७० वर्षीय अटल बिहारी वाजपेयींचा करिष्मा ओसरतोय की काय? अशी परिस्थीती निर्माण झाली होती. पक्षात भावी पंतप्रधानाबद्दल चर्चा व्हायची तेव्हा अडवाणींचं नाव सर्वात अव्वल असायचं.

शिवाजी पार्कवरच्या भाषणात त्या दिवशी अडवाणींनी पंतप्रधान पदासाठी वाजपेयींच्या नावाची घोषणा अडवाणींनी केली. त्यादिवशी अनेकांना स्वतःच्या कानांवर विश्वास नव्हता. २२ मे १९९६ च्या आउट लुकमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अ टेल ऑफ टु चीप्समध्ये सांगण्यात आलं होतं’ की “जेव्हा वाजपेयींनी आडवाणींना प्रश्न केला की एवढी महत्त्वाची घोषणा करण्या आधी तुम्ही मला विचारला का नाही?” तेव्हा अडवाणींनी त्यांना उलटा प्रश्न केला होता “जर मला तुमची मंजुरी विचारली असती तर तुम्ही होकार दिला असता का? “

संघाची परवानगी घेतली नव्हती

वाजपेयी आणि अडवाणी यांच्या मैत्रीपुर्ण संबंधावर अनेक पुस्तक प्रकाशित झाली. त्यातून अनेक किस्से जनतेच्या समोर आले. या घोषणेबद्दल तर अडवाणींनी संघाची संमती घेतली असती तर त्यांना होकार मिळाला नसता असं अडवाणी सांगतात. आयोध्या आंदोलनात भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या आशोक सिंघल यांनाही कल्पना नव्हती की अडवाणी वाजपेयींच्या नावाची घोषणा करणार आहेत. अडवाणी यांनी त्यांच्या ‘माय कंट्री माय लाइफ’ या आत्मचरित्रात वाजपेयींच्या नावाची पंतप्रधानपदाबद्दल घोषणा करण्याबाबत लिहलं की, “मी जे केलं ते बलिदान नव्हतं. तो एका तार्किक आकलनाचा परिपाक होता. पार्टी आणि देशाचं हित कशात आहे हे माझ्या पुढं स्पष्ट होतं”

सुरुवातीच्या काळात वाजपेयींनी अडवाणींना बरोबरीचा दर्जा दिला नाही

वाजपेयी पहिल्यांदा १९६७ ला लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत पोहचले. अडवाणी दिल्ली शहराचे महापौर बनले. यावेळी वाजपेयी अडवाणींना ज्युनिअर समजायचे. परंतू त्यांना बरोबरीचा दर्जा मिळत नव्हता. दोघांमध्ये सामंज्यस्य नव्हतं. दोघांमधली ही दरी मिटवायचं काम अडवाणी यांची पत्नी कमला यांनी केलं. नंतरच्या काळात ७० च्या दशकात दोघांची मैत्री चांगली जुळली. त्यावेळच्या जनसंघाच्या एका नेत्यानं सांगितलं की वाजपेयींना अडवाणीच्या इंग्रजीचं अप्रुप वाटत असल्यामुळं त्यांनी अडवाणींशी चांगली मैत्री जुळवली होती.

सदरील माहिती पुस्तक, वर्तमान, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button