राष्ट्रवादीची विस्तार योजना मित्रांच्या भुवया उंचावणारी नेमके काय करणार जयंत पाटील?

jayant Patil

सत्तेचा वापर पक्षविस्तारासाठी, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच भर राहिला आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये विस्तारवादी महत्त्वाकांक्षा असलेला हा पक्ष आहे. तसे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत. सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादी मागे टाकेल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आता त्याचा प्रत्यय येऊ पाहत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाच्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसमदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौºयाची घोषणा शनिवारी केली. पाटील हे स्वत:  २८ जानेवारीपासून या यात्रेच्या पहिल्या टप्याला सुरुवात करतील. सलग  १० दिवरा ३ हजार किलोमीटरचा प्रवारा करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकत्यांशी संवाद साधतील. या दौºयात पाटील हे विदर्भ, खान्देशातील १४ जिल्हे, ८२ विधानसभा मतदारसंघात जातील आणि आढावा घेतील. त्यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका आणि २० जाहीर सभांचे आयोजनही केले जाईल. या दौºयात वेळोवेळी पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेते सहभागी होतील.

चालू वर्षात राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि त्यावर नजर ठेवूनच हा दौरा असल्याचे म्हटले जाते. राजकीय निरिक्षकांच्या मते शिवसेनेचा गड असलेल्या मतदारसंघांमध्येही पाटील जाणार आहेत. ज्या ठिकाणी २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला पक्षाने चांगली लढत दिली तिथेही जातील.

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नदुरबार असे १४ जिल्हे पायाखाली घालत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेणार आहेत. शिवाय पक्ष वाढवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद  दौºयाचा हा पहिला टप्पा असून दुस-या टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते फिरणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER