शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि काँग्रेसचं नेमकं काय होतं कनेक्शन ?

Balasaheb Thackeray & Congress
  • बाळासाहेब आणि कॉंग्रेस

औरंगाबादच्या नामांतरावरुन कॉंग्रेस आणि शिवसेनेतलं पारंपारिक वैचारिक शत्रुत्त्व अधोरेखित झालंय. याच विरोधाच्या जोरावर शिवसेनेनं अनेक दशकं राजकारण केलंय. शिवसेना जी उभी राहीली ती कॉंग्रेसचं वर्चस्व आणि प्रभाव संपवतच. आधी मंबई, मग ठाणे, तसच कोकनातील कॉंग्रेसला पर्याय म्हणून शिवसेना पुढं आली. मराठवाड्यात कॉंग्रेसचा कधीकाळचा गड आज शिवसेनेचा बालेकिल्लाय. असं असलं तरी आज दोन्ही पक्ष एकमेकांच्या सोबतीनं सत्तेत आहेत. वैचारिक मतभेदांमुळं दोहोंचे खटके उडत असतात. अशात कॉंग्रेस आणि सेनेचे संबंध नेमके कसे होते. बाळासाहेबांचे कॉंग्रेस नेत्यांशी कसे संबंध राहिलेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा, बाळासाहेब आणि यशवंतराव चव्हाण

१९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या लढ्यात बाळासाहेबांची भूमिका महत्त्वाची होती. बाळासाहेबांचे वडील केशव सिताराम ठाकरे हे त्याकाळचं मोठं नाव. त्यांच्याच घरी संयुक्त महाराष्ट्राच्या बैठकी व्हायच्या. नंतरच्या काळात बाळासाहेबांनी यशवंतराव चव्हाणांनाच मार्मिकच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं. काही सामान्य घटना नव्हती. संयुक्त महाराष्ट्राला नेहरू सकारात्मक नव्हते. पर्यायाने यशवंतराव चव्हाणसुद्धा. त्यावेळी काही घटकांमधून बाळासाहेबांवर टीकाही करण्यात आली होती. तुम्ही टोपी बदलून मुख्यमंत्री झालात का? असा सवाल करण्यात आला होता.. याला उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले होते, ” व्यंगचित्रकाराला कधीही टोपी नसते. तुम्ही मात्र उगाच डोके फिरवलेत. आम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी आहोत. पण यशवंतराव चव्हाण हेही महाराष्ट्राचे नेतेत आणि तरुण कर्तृत्वशाली पुरुष आहेत.” असं त्यांनी उत्तर दिलं होतं.

मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेब कॉंग्रेस नेत्यांचा उदोउदो करतात. असा आरोप त्यांच्यावर होत राहिला. मार्मिकवर अनेकदा आरोप व्हायचे. विवेकच्या अंकात मार्मिक हे सरकारचं ढोल बडवणारं पत्र असल्याची टीका केली होती. एकीकडे या टीका होत असल्यातरी मार्मिकनं सरकारला नेहमी वेठीस धरलं होतं. कधी एखाद्या मुद्द्यावर सरकारची पाठराखण केली होती.

शिवसेना की वसंतसेना, बाळासाहेब आणि वसंतराव नाईक

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिलेले वसंतराव नाईक आणि बाळासाहेब यांचे घनिष्ठ संबंध होते. सहकारी संस्था पाठीशी नसताना. विदर्भातील एका बंजारा कुटुंबातील व्यक्तीनं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सलग बारा वर्ष संभाळलं. असं करणारे ते पहिले आणि शेवटचे मुख्यमंत्री.

बाळासाहेबांचे आणि वसंतराव नाईकांचे चांगले संबंध होते. “महाराष्ट्राला आदर्श राज्य करुन दाखवू अशी इच्छा बाळगणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत.” अशा शब्दात त्यांनी वसंतरावांच कौतूक केलं होतं.

एकेकाळी मुबंई डाव्यांचा गड मानली जायची. त्याला खिंडार पाडण्यासाठी वसंतराव नाईक बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला छुपा पाठिंबा देताहेत. असे आरोप व्हायचे. शिवसेनेला वसंतसेना ही म्हणलं जायचं.

इंदिरांच्या आणीबाणीला पाठिंबा

इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. विरोधक टोकाचा विरोध करत असताना बाळासाहेबांनी याच्या नेमकी उलट भूमिका घेतली होती. बाळासाहेबांचा आणीबाणीला पाठिंबा होता.

आणीबाणी लागू केल्यानंतर मार्मिकवर दोन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. “शिवसेना दोन दिवसात बंद करु शकतो” अशी भाषा मुंबईचे कॉंग्रेस अध्यक्ष रजनी पटेलांकडून भाषा वापरली जायची.

कॉंग्रेसला पाठिंबा आणि दोन विधानपरिषदा

१९८०ची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता. याच्या मोबदल्यात सेनेला दोन विधानपरिषदा मिळाल्या होत्या. वामनराव महाडीक आणि प्रमोद नवलकरांना सेनेनं विधानपरिषदेवर पाठवलं होतं.

या विधानपरिषद निवडणूकीत सेनेनं कॉंग्रेसला पाठींबा दिला होता. या निवडणूकीवेळी बाळासाहेबांनी श्रीवर्धन मतदार संघातून बॅरीस्टर अंतूलेंच्या प्रचार सभेत भाषण ही केलं होतं.

राष्ट्रपती निवडणूकीत वारंवार कॉंग्रेसला मदत

प्रमोद महाजानांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती घडवून आणली. भाजपा कॉंग्रेसचा प्रमुख राजकीय विरोधक. राष्ट्रपती निवडणूकीत वारंवार कॉंग्रेसला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. कॉंग्रेसचे राष्ट्रपती उमेदवार एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जींना शिवसेने राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत पाठिंबा दिला होता.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER