विहार म्हणजे नक्की काय ?

Ahar Vihar

आहार विहार चांगला असला पाहिजे असा नेहमी सल्ला दिला जातो. चांगली लाईफ स्टाईल असणे आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे हे सांगितल्या जाते. आहारात काय घ्यावे काय घेऊ नये याकरीता अनेक सल्ले किंवा वाचन उपलब्ध असतात. आहारासोबत विहार म्हणजेच कसे राहावे, सवयी यावरही आरोग्य अनारोग्य अवलंबून असते. स्वस्थ दिनचर्येचा अवश्य भाग म्हणून दंतधावन, अभ्यंग, उटणे लावणे नित्य स्नान हे गरजेचे आहेच. याशिवाय नियमित व्यायाम हा आवश्यक आहे. काहीही न करता आळशी बसणे त्वचेचा वर्ण, कफ मेद (चरबी) कोमलता यांची वाढ करणारे आहे. याउलट व्यायामाने शरीर सुदृढ मजबूत करते. पायी चालण्याच्या सवयीने आळसा विरुद्ध परिणाम होतात. कफ मेदाचा नाश होऊन जठराग्नि चांगली होते. भूक चांगली लागते. बल आयुष्य आरोग्यसुख वाढते.

नेहमी बाहेर जातांना सपाट पादत्राणे वापरावीत त्यामुळे पाय बल नेत्र वीर्य यांचे संरक्षण होते. बाहेर निघतांना छत्रीचा वापर करण्यास सांगितले आहे. ऊन वारा पाऊस यापासून रक्षा होते. नाजूक अवयव उदा. मस्तिष्क नेत्रांची रक्षा होते. आयुर्वेदात दिशेच्या अनुसार वाऱ्याचा शरीरावर काय परीणाम होतो ते सुद्धा वर्णन केले आहे. उदा. पूर्वेचा वारा उष्ण, अभिष्यंदी, त्वचेचे रोग, मूळव्याध कृमी दमा आमवात असे व्याधी वाढविणारा आहे. म्हणूनच पूर्वेकडील येणाऱ्या हवा, ऊन, धूळ, धूर दव वादळ यापासून संरक्षण करावे. शरीर वेडेवाकडे स्थितीत असताना शिंक ढेकर, खोकला, भोजन, मैथून, निद्रा करू नये. संध्यासमयी म्हणजेच प्रातः काळ व सायंकाळ समयी निद्रा अभ्यास संभोग भोजन करू नये. पश्चिमेचा वारा थंड असून चक्कर, दाह, तहान लागणे असे विकारांचा नाश करतो.

दक्षिणेचा वारा उत्तम असून डोळ्यांना हितकर शरीरशक्ती वाढविणारा वातप्रकोप न करणारा आहे. उत्तरेचा वारा थंड असतो व दोष वाढविणारा नसतो. अति उन्हात फिरणे चक्कर तहान घाम आणणारा आहे. वैवर्ण्य रक्तविकार करणारे असते. याउलट चंद्राचे चांदणे थंड पित्त कमी करणारे असते. ऋतु हवामानाचा परीणाम आपल्या शरीरावर होतच असतो त्यामुळे ऋतुनुसार दिनचर्येत बदल करणे गरजेचे आहेच. विहार सद्वृत्तपालन आचाररसायन याव्दारे मनुष्याने आयुष्य कसे व्यतित करावे याबद्दल बरेच मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे. ते पुढील लेखात.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER