ठाकरे सरकार नेमक काय करते ? फडणवीसांचा टोमणा

मुंबई : राज्यातले ठाकरे सरकार (Thackeray Govt) निष्क्रीय आहे असे सुचवताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टोमणा मारला की, ठाकरे सरकार केवळ फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करण्यात मग्न आहे! सर्वसामान्य जनतेचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही.

फडणवीस म्हणालेत, मुख्यमंत्र्यांनी आधी माझी कुटुंब माझी जबाबदारी अभियान आणले. आता मी जबाबदार मोहीम सुरू आहे. म्हणजे सरकार स्वत: कशासाठीच जबाबदार नाही! कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर खापर जनतेवर फोडायचे, इतर गोष्टींसाठी मोदी सरकारला जबाबदार धरायचे, मग राज्य सरकार नेमक काय करते ?

स्टूलची खरेदी …

सरकारच्या गोंधळाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना फडणवीसांनी चुटका सांगून सरकारची फिरकी घेतली. ते म्हणालेत – एखादा विभाग स्टूल खरेदीसाठी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करतो. मंत्रालयाकडून त्या विभागाला तुम्ही स्टूलची उंची किती हवी तेच नमूद केली असे पत्रातून कळवलं जाते. उंची नमूद केल्यावर स्टूल लाकडी हवा की लोखंडी की फायबरचा याबद्दल मंत्रालयातून विचारणा होते. त्याला पत्राने उत्तर दिल्यावर स्टूलाला किती पाय हवेत असा प्रश्न विचारला जातो. मग पुन्हा स्टूलचे वजन किती हवे याची विचारणा होते. शेवटी तो स्टूल काही संबंधित विभागाला मिळत नाही. मग, एखादी घटना घडल्यावर मंत्रालयातून स्टूलबद्दल विचारले जाते तेव्हा संबंधित विभाग सांगतो, पत्रव्यवहाराचे इतके कागद जमा झाले आहेत की आम्ही आता त्यांचाच स्टूल म्हणून वापर करतो!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER