GDP चा नेमका अर्थ काय; नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका

Nana Patole & PM Modi

मुंबई :- सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मते मांडले. नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर टीका केली. खासदार मोहन डेलकर आत्महत्या, कोरोना, इंधन दरवाढ आदी मुद्द्यांवरून मोदी (PM Narendra Modi) सरकारवर निशाणा साधला.

नाना पटोले यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. हे प्रकरण गंभीर आहे, याची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी, अशी मागणी पटोले यांनी केली. कोरोना काळात राज्य सरकारने चांगले काम केले. लॉकडाउनसाठी सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

केंद्राचा GDP म्हणजे नेमके काय?

इंधन दरवाढीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले जीडीपीचे आकडे चुकीचे आहेत, असा दावा नाना पटोले यांनी विधानसभेत केला. GDP वाढवला म्हणजे Gas, Diesel आणि Petrol यांच्या दरात वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर आहे. केंद्र सरकार इंधनावर दरवाढ करून लूट करत आहे, असा आरोप पटोलेंनी केला.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशात सुरू असलेल्या कोरोना संसर्गाचे संकट अद्यापही टळले नाही. महाराष्ट्रातही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाबळींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली.

ही बातमी पण वाचा : इंधन दरवाढीसंदर्भात मोदींना दिला ‘हा’ सल्ला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER