गावसकर नेमके काय म्हणाले आणि काय होतेय टीका?

दुबईत (Dubai) पंजाब किंग्ज इलेव्हनविरुध्दच्या (Kings Xi punjab) गमावलेल्या सामन्यात रॉयल चॕलेंजर्सचा (RCB) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अपयशी ठरल्यानंतर माजी कर्णधार व समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar). यांनी केलेल्या टीकेवरुन वाद पेटला आहे. ज्या शब्दात गावसकर यांनी ही टीका केली आणि,विराटची पत्नि अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) विनाकारणच उल्लेख केला त्यावरुन क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत आणि स्टार स्पोर्टसने सुनिल गावसकर यांना कॉमेंट्रीवरुन हटवावे अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात जे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरले आहे त्यात सुनील गावसकर

‘इन्होने लॉकडाउन मे बस अनुष्का की गेंदो की प्रॅक्टिस की है’

असे विधान केल्याचे म्हटले आहे. परंतु या सामन्याच्या त्यावेळचीध्वनिचित्रफित बारकाईने ऐकली तर गावसकर हेच वाक्य वेगळ्या पध्दतीने बोललेले असल्याचे दिसुन येते. व्हिडीओतील कॉमेंटरी ऐकल्यानुसार झालेले संभाषण असे आहे…

गावसकर नेमके काय बोलले

गावसकर: जितनी वोह प्रॅक्टीस करे उसीसे वो बेहतर बन सकते है…वो जानते है! अब जो लाॕकडाऊन था तो सिर्फ अनुष्का की बोलींग की प्रॅक्टिस की इन्होने! उससे तो कुछ नही बनना है?

सहकारी : उनके अपार्टमेंट मे वो प्रॕक्टीस कर रहे थे.. इतनी भी प्रायव्हसी नही है की पास वाली बिल्डिंगसे उसका भी व्हिडिओ ले लिया!

मात्र तरीसुध्दा ज्या प्रकारे गावसकर यांनी या प्रकरणात अनुष्काला ओढले आहे त्यावरुन नाराजी आहेच. लोकांचे म्हणणे आहे की विराट अपयशी ठरतोय त्यात त्याच्या बायकोचा काय दोष!

यासंदर्भात अर्पीत माहेश्वरी यांनी व्टिटमध्ये म्हटलेय की, अनुष्का ट्रेंडींग आहे म्हटल्यावर मला वाटले की, तिलाही एनसीबीकडून समन्स आलाय की काय? नंतर लक्षात आले की जगातील सर्वात असभ्य देशात, जर पती अपयशी ठरत असेल, खराब काम करत असेल तर दोष पत्नीला दिला जातो परंतु पती जर चांगली कामगिरी करत असेल, यशस्वी होत असेल तेंव्हा मात्र पत्नीला श्रेय दिले जात नाही.

अनन्या म्हणते की या देशाला कोणत्याही गोष्टीत महिलांना खेचण्याची सवय आहे. तो खेळतो, तो मैदानावर असतो आणितो मैदानावर काय करतो त्याच्याशी अनुष्काला काही घेणे देणे नाही. महिलांना प्रत्येक गोष्टीत ओढणे थांबवा.आम्ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही आहोत.

एकाने स्टार स्पोर्टसला हात जोडून विनंती केली आहे की, कृपया तुमच्या काॕमेंटेटर्सना सांगा की क्रिकेटपटूंच्या पत्नी/ मैत्रिणींबद्दल बोलू नका.

रुचिता हिने म्हटलेय की गावसकर यांनी असे द्वयर्थी विधान करताना विचार करायला हवा होता. एकाने म्हटलेय की गावसकर खरोखरच असे बोलले असतील तर त्यांचे थोबाड फोडायला हवे. रिया हिने म्हटलेय की गावसकर, तुम्ही सर्व मानसन्मान, आदर घालवला आहे. कुणाच्याही कुटूंबाला काहीही संबंध नसलेल्या प्रकरणात खेचण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न मनासा हिने केला आहे. ते कशाच्याही संदर्भात बोलू देत. हे विधान स्विकाराह्य नाही असे अनिषा हिने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER