नेमक्या काय आहेत अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी?

Union Budget 2021

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज सोमवारी संसदेत अर्थसंकल्प (Budget 2021) सादर केला. गेल्या  वर्षभर कोरोना (Corona) महामारीने अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य भारतीयांचे लक्ष लागून होते. अर्थमंत्री सीतारामण यांनी सादर केलेल्या

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी अशा आहेत : 

 • 16.5 लाख कोटी कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
 • लहान सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार कोटींची तरतूद
 • रस्ते मंत्रालयासाठी 1.18 लाख कोटींची तरतूद
 • प्राप्तीकर रचनेत कसलाही बदल नाही
 • 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना आयटी रिटर्न भरण्यापासून सुट
 • आरोग्य क्षेत्रासाठी 2.23 लाख कोटींची तरतूद
 • नव्या आरोग्य योजनेसाठी 64 हजार कोटींच्या तरतूदीची घोषणा
 • कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद
 • मिशन पोषण 2.0 चा शुभारंभ करणार
 • मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद
 • रेल्वेसाठी 1.10 लाख कोटींची तरतूद
 • भूसावळ ते खरगपूर रेल्वे कॉरिडोरची घोषणा
 • नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटींची तरतूद
 • नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटींची तरतूद
 • १०० सैनिक स्कूल उभारणार, उच्च शिक्षणासाठी कमिशनची स्थापना होणार. त्यासाठी कायदा बनवणार
 • लडाखमध्ये उच्च शिक्षणासाठी लेह येथे सेंट्रल विद्यापीठ उभारणार
 • ७५८ एकलव्य स्कूल आदिवासी भागात उभारणार
 • मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्कची सुरूवात करणार, तीन वर्षांत सात टेक्स्टाईल पार्क उभारणार
 • सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमधील निर्गुंतवणुकीचे धोरण, निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी उभारणार
 • हायड्रोजन मिशनची स्थापना करण्यात येईल
 • उज्ज्वला योजनेमध्ये आणखी १ कोटी लाभार्थ्यांचा समावेश करणार
 • काश्मीरमध्ये गॅस पाईपलाईन प्रकल्पाची घोषणा
 • जल जीवन मिशन-अर्बनचा शुभारंभ करणार
 • जल जीवन मिशनसाठी 2.87 हजार कोटी खर्च करणार
 • अर्बन स्वच्छ भारत मिशनसाठी 1.41 लाख कोटींची तरतूद
 • डिजीटल जनगणनेसाठी ३ हजार कोटींची तरतूद
 • लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद
 • सरकारी बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद
 • डेव्हलमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन (DFI)ची स्थापना करण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद
 • पर्यावरणाच्या दृष्टीने वाहनांच्या वापराच्या कालावधीवर मर्यादा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER