त्रिवेंद्र सिंगांसाठी माणसे मेली तर काय फरक पडतो; जितेंद्र आव्हाडांची टीका

Trivendra Singh Rawat - Jitendra Awhad

मुंबई : एकीकडे देशात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. या प्रादुर्भावामुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त व्यक्तव्ये केली जात आहेत. हे वादग्रस्त वक्तव्य उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे (BJP) नेते त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला चांगलाच फटका बसलेला आहे. अशातच त्रिवेंद्र सिंग यांनी कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे. “हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात? कोरोना सुद्धा जीव आहे त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, असे म्हणत आहेत. त्यांच्यासाठी माणसे मेली तर काय फरक पडतो.” अशा टीका आव्हाडांनी केली आहे. यावेळी त्यांनी व्हिडीओही ट्विटरला शेअर केला आहे.

त्रिवेंद्र सिंग काय म्हणाले
त्रिवेंद्र सिंग रावत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोरोना संदर्भाचे मत व्यक्त केले आहे. “कोरोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. बाकी जीवांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र, आपण स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत. मात्र, तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवतोय. आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी या विषाणूच्या पुढे जावे लागणार आहे.” असे त्रिवेंद्र सिंग म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button