ब्रम्हचारी विरूद्ध बिकनी, वाजपेयींची सभा फ्लॉप करण्यासाठी इंदराजींनी काय केलं? वाचा भन्नाट किस्सा

Maharashtra Today

१८ जानेवारी १९७७ ची संध्याकाळ, देशात राजकीय वातावरण गढूळ झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांनी रेडीओद्वारे देशाला संबोधित केलं. मार्च १९७७ ला देशात लोकसभा निवडणूका पार पडतील. लोकसभा भंग करत असल्याचीही घोषणा त्यांनी केली. विरोधी पक्षातले सर्वच नेते तुरुंगात होते. त्यांच म्हणनं होती की आणीबाणी लागू असताना निवडणूका घेतल्या तर त्याचा निर्पेक्ष निवडणूका होणार नाहीत. आणीबाणी लागू केल्यानंतर इंदिरांनी लोकसभेचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी वाढवला होता. सर्वांना उमेद होती की निवडणूका १९७८ ला होतील परंतू १९७७ लाच निवडणूकांची घोषणा झाली.

तिहाड कारागृहात सुरु होत्या मसलती

दिल्लीचं ‘तिहाड’ कारागृह विरोधी गटातल्या नेत्यांच्या मसलतीच केंद्र बनलं. काही नेते निवडणूक लढण्याच्या बाजूनं होते. निवडणूकीला आणीबाणीविरुद्धच हत्यार म्हणून वापरण्याकडे त्यांचा कल होता. तर दुसऱ्या बाजूला जॉर्ज फर्नांडीस यांच मत होतं आणीबाणीत निवडणूका घेऊन सरकार जनतेला धोका देणार आहे. दुसऱ्या बाजूला इंदिरांविरुद्ध संपूर्ण देशाला उभं करणाऱ्या जे. पी. नारायण यांची तुरुंगातून आरोग्यचं कारण देत सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर पडताच जे. पींनी निवडणूकीच्या निवडणूकीला पाठिंबा देण्याचं जाहिर केलं.

सर्व विरोधी पक्षांच्या एकत्रकरणातून जेपींनी ‘जनता दल’ स्थापित केलं

जे. पी. तुरुंगातून बाहेर पडले आणि सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची मोहीम सुरु केली. इंदिरा गांधी विराचारांची सर्वपक्षीय मोट त्यांनी बांधली. विरोधातल्या सर्व पक्षांना एकत्र करुन एक पक्ष बनवण्याचा त्यांचा विचार सर्वांना पटला. ‘जनता दल’ स्थापन झालं. बऱ्याच नेत्यांची तुरुंगातून सुटका झाली. जॉर्ज फर्नांडीस आणि नानजी देशमुख(Nanaji Deshmukh) यांना निवडणूका संपेपर्यंत तुरुंगात डांबण्यात येणार होतं हे आधीच स्पष्ट होतं.

आणि इंदिरांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली

निवडणूकांची धामधुम सुरु झाली. ३० जानेवारीला अटलबिहारी वाजपेयी आणि मोरारजी देसाईंची सभा दिल्लीच्या चांदणी चौकात आयोजित केली होती. त्या सभेची परवानगी मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं होतं. ते निवेदन रद्द करण्यात आलं. विरोधी गटाला मजबूत होताना बघण्याची सरकारची इच्छा नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत अटलबिहारी वाजपेयी आणि मोरारजी देसाई यांची सभा रद्द केली. सभेचं ठिकाण बदललं. ‘रामलीला मैदान’मध्ये सभेच आयोजन करण्यात आलं. इंदिरांची ही सर्वात मोठी चुक होती. वाजपेयींना ऐकण्यासाठी लाखोंनी गर्दी केली.

इंदिरांना पराभव स्पष्ट दिसत होता.

वाजपेयींना ऐकण्यासाठी लाखो लोक जमले. वाजपेयींनी भाषणाला सुरुवात नेहमीच्या शैलीत केली. कवितेने. ते म्हणाले,

बड़ी मुद्द्त के बाद मिले हैं दीवाने,
कहने सुनने को बहुत हैं अफसाने,
आओ जल्दी से कर लें दो बातें,
ये आजादी कब तक रहेगी, कौन जाने।

आणीबाणीच्या आणि इंदिरांच्या निरांकुश सत्तेविरोधात जनतेचं मत असल्याचं या सभेनं स्पष्ट केलं, इंदिरांना याच सभेत त्यांचा पराभव स्पष्ट दिसत होता. खुर्ची वाचवण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न इंदिरा करण्याच त्यांनी याच दिवशी ठरवलं.

कॉंग्रेसला गळती

२ फेब्रुवारी १९७७ ला कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि बिहारमधून खासदार असलेल्या जगजीवन राम यांनी कॉंग्रेस सोडली. सोबतच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा आणि नंदिनी सतपथी यांनी कॉंग्रेसला रामाराम ठोकला. इंदिरांनी जगजीवन राम यांना बरंच काही ऐकवलं. आणीबाणीमुळं कुठं अन्याय होत होता तर माझ्या लक्षात का नाही आणून दिला? आणीबाणीबद्दल भिन्न मतं असतील तर मला का नाही सांगितले? इंदिरांच्या कॅबिनेटचा हिस्सा असणाऱ्या जगजीवन राम यांना इंदिरांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. या उत्तरासाठी त्यांनी पुन्हा रामलीला मैदानावर सभा बोलवली. सभेचा प्रस्ताव ऐकून इंदिरांच्या पायाखालची वाळू सरकली.

विरोधी पक्षाची ३० जानेवारीची सभा यशस्वी झाली होती. जनतमत जनता दलाच्या बाजूने होतं. कॉंग्रेसचा मोठा गट तुटुन जनता दलाला मिळाला. जगजीवन राम यांच्या सभेनं वातावरण तापलं होतं. ही सभा कोणत्याही परिस्थीतीत हाणून पाडणं गरजेचं होतं. पण कशी? याबद्दल कोणाचंच ठाम मत बनत नव्हत तेव्हा इंदिरांना त्यांचे केंद्रीय माहिती आणि सुचना मंत्री विद्याचरण शुक्ला एक सल्ला दिला.

बिकनी आणि बोल्ड सीन असेला बॉबी चित्रपट दुरदर्शनवर प्रसारीत करावा

७० च्या दशकात सुपरहीट सिनेमांची तिकीटं मिळायची नाहीत. न डीव्हीडी प्लेअर होते न आजच्या सारखे मोबाईल फोन. शिवाय त्याकाळा बिकनी सीन बघायला मिळणं म्हणजेच मोठीच गोष्ट. ‘बॉबी’ (Bobby)सिनेमामुळंच भारतीय सिनेमात बोल्ड सिन्सची सुरुवात झाली. असा चित्रपट सभेच्याच वेळी दुरदर्शनवर प्रसारित होणार म्हणल्यावर सभेला गर्दी होणारच नाही हे निश्चित आहे असा सर्वांचा विचार झाला. इंदिरांना कोणत्याही परिस्थीतीत ती सभा फ्लॉप करायची होती.

इंदिरांनी हा डाव टाकला तरी सभेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी जमली. भारतातल्या सर्वात मोठ्या सभांपैकी एक अशी ती सभा झाली. जगजीवन म्हणाले “आणीबाणीत काय चुका झाल्या हे जर मी इंदिरांना सांगितलं असतं तर जगजीवन एका बाजूला असता आणि राम एका बाजूला.” त्यांनी इंदिरांवर कडाडून टिका केली. मंचावर उपस्थीत अटलबिहारी वाजपेयींनी(Atal bihari Vajpayee) देखील तुफान फटकेबाजी केली सभा यशस्वी ठरली. पुढं निवडूणांचा निकाल लागला. तेच झालं, इंदिरांना सत्ता सोडावी लागली. मोरारजी देसाई भारताचे पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान बनले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button