राऊत आणि फडणवीस चहा-बिस्किटावर तर नक्कीच बोलणार नाहीत : भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Sanjay Raut - Devendra Fadnavis - Chandrakant Patil

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीवर भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते एकमेकांना भेटत असतील, दोन-अडीच तास बोलत असतील तर ते चहा-बिस्किटावर नक्कीच बोलणार नाहीत. त्यात राजकीय चर्चा होणारच,’ असे पाटील म्हणाले . त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत .

मुंबईत (Mumbai) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केले . महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईतील एका हॉटेलात भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. ही भेट राजकीय नव्हती. ‘सामना’साठी घ्यावयाच्या मुलाखतीबाबत होती, असा खुलासा राऊत यांनी केला आहे, तर फडणवीसांनी यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER