आर्थर रोड जेलवर बोलायला माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरी कोणती ? :  छगन भुजबळ

What better person than me to speak at Arthur Road Prison-Chhagan Bhujbal

नाशिक :  कोरोनाने (Corona)शहरांमधील गर्दी ते गावोगावच्या शिवारावरही शिरकाव केला. त्यात कारागृहातील कैद्यांनाही कोरोनाची झड पोहचली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ गुन्ह्यांसाठी कारागृहात असणा-या कैद्यांना सोडण्यातदेखील आले.

तर, दुसरीकडे कारागृहातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी, प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले आहे. अशाच प्रयत्नांमुळे आर्थरोड जेलमधील (Arthur Road Prison) कोरोनाची स्थिती कशी नियंत्रणात आणली याचे वास्तव राज्याचे अन्न सुरक्षा मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, ‘आर्थर रोड जेलमधील वास्तव्य भयानक आहे. बरं झालं या जेलमधील कैदी लवकर पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाले’. नाशिकमध्ये खास पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

नाशिक शहर आणी ग्रामीण दलात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे.

यावेळी नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांच्या संकल्पनेतील हे सेंटर तयार करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी बोलताना आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना कसं कोरोना मुक्त केलं हे त्यांनी सांगितलं.

आणि हे सांगताना भूजबळांना भावनेच्या भरात त्यांचा जेलमधला काळ आठवला. भूजबळ म्हणाले, आर्थर रोड जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते. मीच अडीच वर्ष होतो. नशीब आता बाहेर आलो आहे. या जेलवर बोलायला माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरी कोणती ? हा सवालही त्यांनी उपस्थित केला. भूजबळांच्या या गोष्टींनी हा कार्यक्रम चांगलाच गाजला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER