क्रिकेट आणि सचिन तेंडूलकरबद्दल बोरीस बेकर काय म्हणाला?

Boris Becker

बर्लिन : लॉरियस अकादमी क्रीडा पुरस्कारांच्या शानदार सोहळ्यात कोट्यवधी क्रिकेटपटूंच्या गळ्यातील ताईत ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकर याला गेल्या २० वर्षातील ‘बेस्ट स्पोर्र्टींग मोमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०११ च्या विश्वविजयानंतरच्या त्याच्या विजयी मिरवणुकीच्या ‘कॅरीड आॅन दी शोल्डर्स आॅफ नेशन’ या छायाचित्राला हा पुरस्कार मिळाला आणि यशस्वी आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉसह टेनिसमधील ग्रेट बोरिस बेकरच्या हस्ते मास्टर ब्लास्टरला सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोरिस बेकरला क्रिकेटबद्दल विचारले असता तो काय म्हणाला माहित्येय? बेकर क्रिकेटबद्दल बोलताना म्हणाला की, ‘मला गवतावर खेळायला फार आवडते. मला गवताचा रंग फार आवडतो पण मी क्रिकेटमध्ये तेवढा चांगला नाही. मी भारतातही येऊन गेलो आहे आणि तुम्ही भारतात असाल तर तेथील जनतेचे क्रिकेटप्रती प्रेम पाऊल ठेवल्या ठेवल्याच कळते आणि ह्या माणसासमोर (सचिन तेंडुलकर) तुम्ही नतमस्तक व्हावे एवढी त्याची तुफान लोकप्रियता आहे.