Twitterवर चालवलेल्या बदनामी मोहिमा कोणत्या नियमात बसतात? शिवसेनेचा भाजपाला टोमणा

Maharashtra Today

मुंबई :- ‘ट्विटर’चे (Twitter) राजकीय महत्त्व भाजपासाठी संपले आहे. कारण भाजपाविरोधकांनी या माध्यमांचे कोपरे बळकावून भाजपाच्या खोट्या प्रचारास उत्तर देणे सुरू केले. ‘अरे ला कारे’ (Aala ka Re) जोरात सुरू आहे व अनेक ठिकाणी ‘ट्विटर’च्या (Twitter) रणमैदानातून भाजपाला, त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागत आहे. त्यांच्या ‘ट्विटर’ सेनेचीही दाणादाण उडत आहे. ‘ट्विटर’चा अतिरेक व इतर काही गोष्टी आहेतच, पण याच अतिरेकाचा वापर करून भाजपा व मोदी २०१४ साली विजयी झाले होते. हे कोणत्या नियमात बसत होते?’ असा टोमणा शिवसेनेने ट्विटर आणि केंद्र सरकारच्या वादात भाजपाला मारला.

मोदी सरकारने (Modi Govt) सोशल माध्यमांना लगाम घालण्यासाठी भारताचे नियम पाळण्यास बंधनकारक केले आहे. त्यावरून मोठा वाद सुरू आहे. या मुद्यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा भाजपावर (BJP) टीका केली आहे.

अग्रलेखात म्हटले आहे कि, कालपर्यंत ट्विटर भाजपा किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. आता भाजपाला ट्विटरचे ओझे झाले असून हे ओझे कायमचे फेकून द्यावे या निर्णयाप्रत मोदीं सरकार आले आहे. समाजमाध्यमांवर गेल्या काही वर्षांपासून चिखलफेकीचा, बदनामी मोहिमांचा कार्यक्रम सुरू आहे. त्याची निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, कथा-पटकथा सर्वकाही भाजपाचेच होते, असा आरोप सामानाने केला आहे.

फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍप या माध्यमांचा मनसोक्त वापर करण्याची रीत इतर राजकीय पक्षांना माहीत नव्हती तेव्हा या कार्यात भाजपाने नैपुण्य प्राप्त केले होते. हिंदुस्थानातील ट्विटरसह सर्वच समाजमाध्यमांचे जणू आपणच मालक आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत तोरा होता.

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका भाजपाने जिंकल्या व ते करताना राजकीय विरोधकांची यथेच्छ बदनामी केली. राहुल गांधींसाठी ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या (Manmohan Singh) ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ‘ट्विटर’ वगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या. जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत होत्या, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले तेव्हा भाजपाचे धाबे दणाणले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button