आज अक्षयकुमार कोणती घोषणा करणार?

Akshay Kumar

नेहमीचे दिवस असोत वा लॉकडाऊन (Lockdown). बॉलिवूडमध्ये (Bollywood) फक्त एक कलाकार असा आहे जो सतत कार्यरत असतो. आताही लॉकडाऊनमध्ये अक्षयकुमारने (Akshay Kumar) त्याच्या अर्धवट चित्रपटांच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण केले. काही चित्रपटांच्या स्क्रिप्टही ऐकल्या. एवढेच नव्हे तर लॉकडाऊन उठल्यानंतर सर्वप्रथम शूटिंग करायला बाहेर पडला तो अक्षयकुमारच. आताही अक्षयने एकामागोमाग एक चित्रपट साईन करण्याचा धडाका लावला आहे. एवढेच नव्हे तर अनेक जाहिरातीही त्याने साईन केल्या असून त्यांचे शूटिंगही करू लागला आहे. त्यातच १५-२० दिवसांनी एखाद्या नवा चित्रपटाची घोषणाही अक्षयकुमार सोशल मीडियावरून करतो. कालही त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून उत्सुकता निर्माण केली आहे.

अक्षयकुमारने बुधवारी ट्विटरवर एक पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर पाहून अक्षयच्या फॅन्सची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. अक्षयने शेअर केलेले पोस्टर हे एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरसारखे वाटत आहे. यात अक्षयकुमार कुलभूषण खरबंदासोबत दिसत आहे. अक्षय त्याच्या मोबाईलमधून कुलभूषण खरबंदा यांना काहीतरी दाखवतोय की सेल्फी काढतोय ते समजत नाही. या पोस्टरवर लिहिले आहे, अ फादर-सन सक्सेस स्टोरी, मेड इन इंडिया आणि खालच्या बाजूला लिहिले आहे- पापा चले हरिद्वार, बेटा बांटे पगार. या पोस्टरसोबत अक्षयने पोस्टमध्ये लिहिले आहे, भारतात ज्याप्रमाणे व्यवसाय केला जातो, तो आता बदलणार आहे. आता तुमचा व्यवसाय होईल स्मार्ट. उद्या सकाळी ११.३० वाजता तुमच्या स्क्रीनवर मी येणार आहे. यासोबतच अक्षयने ‘मेड इन इंडिया हॅशटॅग’ ही लिहिले आहे. अक्षयची ही एखादी नवी जाहिरात असावी असा अंदाज या पोस्टरवरून लावण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER