सदोष व्हेंटिंलेटर्स पुरवणाऱ्यांवर काय कारवाई केली; औरंगाबादच्या उच्च न्यायालयाने विचारले

Bombay High Court Aurangabad Bench - Faulty Ventilators

औरंगाबाद : पंतप्रधान सहाय्यता निधीतून मराठवाड्याला मिळालेल्या सदोष व्हेंटिलेटर्सची (Faulty Ventilators) आज औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad High Court) गंभीर दखल घेतली. हे व्हेंटिंलेटर्स ज्याने पुरवले त्याच्याबाबत काय कारवाई केली असा सवाल कोर्टाने केंद्राला केला

सदोष व्हेंटिंलेटर्सबाबत माध्यमात आलेल्या बातम्यांची न्यायालयाने दखल घेतली. मराठवाड्यात जे १५० व्हेंटिलेटर्स आले होते त्यापैकी ३७ अजून उघडलेच गेले नाहीत तर उर्वरित सगळेच व्हेंटिलेटर्स खराब असल्याचे बातम्यात सांगण्यात आले आहे. हा सगळा प्रकार फार गंभीर आहे. व्हेंटिलेटर्स जीव वाचवणारे आहेत, नादुरुस्त व्हेंटिलेटर्स रुग्णांचा जीव घेणारे ठरू शकतात असेही न्यायालयाने म्हटले आहे. नेत्यांनी व्हेंटिलेटर्स प्रकरणात लक्ष घालू नये ते त्यातील तज्ज्ञ नाहीत असे निरीक्षण नायल्याने नोंदवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button