… सरकारने काय कारवाई केली? अहवाल मागवा; फडणवीसांची राज्यपालांकडे मागणी

devendra fadnavis - Governor Bhagat Singh Koshnyari - Maharastra Today

मुंबई : राज्यात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीचे रॅकेट, पोलिसांकडूनच खंडणी वसूल करण्याचे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. या प्रकरणांवर राज्य सरकारने काय कारवाई केली याचा अहवाल प्रशासनाकडून मागवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांकडे केली.

फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Governor Bhagat Singh Koshnyari) यांना राजभवनावर भेटले. या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळगलेले मौन गंभीर आहे. मुख्यमंत्री इतक्‍या गंभीर विषयांवर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे, असे फडणवीस म्हणाले.

राज्यात करोनाचा उद्रेक झाला असतानाही राज्य सरकार योग्य कार्यवाही करत नाही. राज्य सरकारच्या अपयशाची अशी शंभर प्रकरणे राज्यपालांच्या निदर्शनाला आणून दिली आहेत. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी यासंदर्भात हस्तक्षेप करत अहवाल मागवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केल्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.

शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा व इतर नेत्यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER