शिवसेनेसोबत युती केलीत त्याचे काय? भाजप नेत्याचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला सवाल

jitin prasad - kapil sibal - Maharashtra Today

मुंबई : काँग्रेसला सोडचिट्ठी देत जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . यावरून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जितीन प्रसाद यांनी विचारसरणी बाजूला ठेवून भाजपात प्रवेश केल्याची टीका काँग्रसेचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली होती. यावर जितीन प्रसाद यांनी पलटवार केला असून शिवसेनेसोबत युती केली तेव्हा नेमकी पक्षाची काय विचारसरणी काय होती? असा सवाल त्यांनी कपिल सिब्बल यांना विचारला आहे .

काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली तेव्हा विचारसरणी कुठे होती? पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत गेले तेव्हा काय विचारसरणी होती? आणि त्याच वेळेला ते केरळमध्ये डाव्यांसोबत लढत होते,” असं सांगत जितीन प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीविरोधात वक्तव्यं केल्याने पक्षाचं नशीब बदलणार नाही असा टोलाही यावेळी त्यांनी सिब्बल यांना लगावला आहे .

दरम्यान भारतीय राजकारणात आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे अशापद्दतीचे निर्णय विचारसणीच्या आधारे अजिबात घेतले जात नाहीत. याआधी हे ‘आया राम गया राम’ होते , आतात ‘प्रसाद राम राजकारण’ आहे, अशी टीका सिब्बल यांनी जितीन प्रसाद यांच्यावर केली होती .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button