लाखो भारतीयांच्या भूकबळीला विस्टीन चर्चील जबाबदार होता!

Maharashtra Today

“मी भारताचा द्वेष करतो” हा विचार त्या पंतप्रधानाचं आहे ज्यानं कधी भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. संपूर्ण जगाला गुलाम बनवणाऱ्या राष्ट्राचा तो पंतप्रधान होता, त्याच नाव ‘विस्टर्न चर्चिल.’ भारतीय संसाधनांची अक्षरशः लुट माजवणारा हा नेता. भारताच्या साधनसंपत्तीवर त्याचं आकर्षण होतं. हे त्यावळचं त्यांच विधान आहे जेव्हा संपुर्ण जग दुसऱ्या महायुद्धाच्या गर्तेत ढकललं गेलं होतं. चर्चिल यांनी इंग्लंडच्या ताब्यात असणाऱ्या सर्व वसाहतींना गुलामीच्या घट्ट साखळीत बांधलं होतं. त्यांच नाव २० व्या शतकात हिटलर आणि मुलोलिनीसारख्या हुकुमशहांमध्ये चर्चिल यांची गणना होऊ लागली.

ब्रिटीश सैन्यात अधिकारी होते

विस्टर्न चर्चिल(Westin Churchill) यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८७४ मध्ये झाला. ते एक प्रेरणा दायी राजकीय नेते, लेख, वक्ते होते. इंग्लंडच्या राजकारणात भाग घेण्याच्या आधी ते सैन्य अधिकारी होते. त्यांनी अनेका युद्धात इंग्लंडच्या फौजेचं नेतृत्त्व केलं होतं.भारत आणि सुडानमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला होता. १९०० साली ते ब्रिटन संसदेचे सदस्य बनले. तिथून राजकीय कारकिर्द सुरु झाली.पुढची तीन दशकं लिबरल आणि कंझरव्हेटीव्ह सरकारांमध्ये त्यांनी काम केलं. पहिल्या महायुद्धादरम्यान त्यांना ‘लॉर्ड ऑफ अॅडमिरल्टी’ बनवण्यात आलं. यानंतर १९४० मध्ये इंग्लंडच्या प्रधानमंत्री पदाची आणि संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी मुत्सद्देपणाच्या जोरावर नाझी जर्मनीचा पराभव केला. चर्चिल कंझरव्हेटीव्ह पार्टीकडुन पुन्हा पंतप्रधान बनले. पहिल्यांदा १९४० ते १९४५ पर्यंत तर दुसऱ्यांचा १९५१ ते १९५५ पर्यंत. २६ जुलै १९४५ ला चर्चिल यांना नाकारुन इंग्लंडच्या जनतेनं लिब्रल पार्टीच्या ‘क्लेमेंट एटली’ यांना पंतप्रधान म्हणून निवडूण दिलं.

भारताच्या स्वातंत्र्यांला विरोध

ब्रिटीश नौसेनेत उच्च पदावर काम करणारे माउंट बॅटन हे चर्चिल यांचे चाहते होते. याचं एक कारण होतं लॉर्ड माउंट बॅटन यांनी ब्रिटीश साम्राज्याच्या प्रचार आणि प्रसारात कोणतीच कसर सोडली नव्हती अगदी चर्चिल यांच्याप्रमाणे. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन वाटलं की भारताला अधिक काळ गुलाम बनवुन ठेवणं योग्य नाही. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य देताना फाळणीचा विचार त्यांनी केला. भारताला स्वातंत्र्य मिळू नये ही चर्चिल यांची इच्छा होती. जर त्यांच सरकार भारताच्या स्वातंत्र्यावेळी ब्रिटनला असतं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं नसतं.

“गांधी मेले तर बरं होईल”

गांधीचं व्यक्तीमत्त्व चर्चिल यांना रुचायचं नाही. ते खुलेपणानं अनेकदा भारताला गुलाम ठेण्याची त्यांची इच्छा बोलून दाखवायचे. तर दुसऱ्या बाजूला गांधींना भारताला स्वतंत्र झालेलं पहायचं होतं. चर्चिल गांधींना राजद्रोही आणि नग्न फकीर म्हणायचे. त्यामुळं चर्चिल यांना मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. १९४२ साली गांधींच्या उपोषणावर कॅबीनेट बैठकीत बोलताना चर्चिल म्हणाले होते गांधी मेले तर बरं होईल. ब्रिटीश साम्राज्याची एका शत्रु कडून सुटका होईल असं ते म्हणाले होते.

रक्ताने माखलेत हात

चर्चिल यांना दुसऱ्या महायुद्धाचं हिरो मानलं जातं जनता त्यांची पुजा करते. पंरतु ते हिंसा, साम्राज्यवाद आणि वंश श्रेष्ठत्त्वाचा पुरस्कार करायचे. चर्चिलांना ब्रिटनमध्ये जितकी प्रतिष्ठा मिळाली भारतात त्यांच तितकंच त्यांच नाव बदनाम आहे. हजारो भारतीयांच्या तडफूण मरण्याला ते जबाबदार आहेत. हिटलरनं जितके ज्यु छळ छावणीत मारले तितके भारतीय अन्नावाचून तडफून मरण्यासाठी चर्चिल कारणीभूत ठरले. बंगालमध्ये दुसऱ्या महायुद्धावेळी भयानक दुष्काळ पडला होता. गरजवंतांना वाटण्यासाठी आलेलं धान्य त्यांनी युद्धभुमीवरील सैनिकांसाठी नेलं यामुळं ५० लाख भारतीयांनी याची किंमत जीव देऊन चुकवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button