पश्चिम रेल्वेचा महिलांना मोठा दिलासा; उद्यापासून लेडीज स्पेशल ट्रेन पुन्हा धावणार

Train

मुंबई : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लाईफ लाईन असलेली रेल्वेसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत. पश्चिम रेल्वेनं मुंबई व उपनगरांतील महिला प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

लॉकडाऊन घोषित झाल्यापासून पहिल्यांदाच मुंबईत लेडीज स्पेशल ट्रेन धावणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कामांतील वेळेतील साम्य लक्षात घेता लोकलमध्ये गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विरारहून चर्चगेटसाठी सकाळी ७.३५ ची तर चर्चगेटहून  विरारसाठी संध्याकाळी ६.१० ची लेडीज स्पेशल ट्रेन धावणार आहे.

या निर्णयामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेवर सहा लोकलच्या फेऱ्यांमध्ये सोमवारपासून वाढ होणार आहे. ज्यात दोन फेऱ्या या लेडीज स्पेशल असणार आहेत. सध्या ५०० लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत. त्या वाढून आता ५०६ फेऱ्या होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील आणि राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने सध्या प्रवास करता येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER