कोल्हापूर : एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते शाहिद शेख यांना जमावाने चोपले

Shahid Sheikh MIM

कोल्हापूर : घरकुल वादावरून महापालिका अधिकारी आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये चक्क हाणामारीचा प्रकार आज (शुक्रवार) दुपारी घडला. महापालिकेच्या आवारात घडलेल्या या हाणामारीत एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते शाहिद शेख यांना जमावाने चोप दिल्याने ते जखमी झाले आहेत.

कोल्हापुरात नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या

ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयातील अधिकारी हर्षजित घाटगे यांना गुरुवारी एमआयएमच्या कार्यकर्त्यानी घरकुल मिळण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली होती. आज एमआयएमचे कार्यकर्ते अधिकारी उद्धट वर्तणूक करत असल्याची तक्रार घेऊन आयुक्तांना भेटणार होते. अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देत खाली आल्यानंतर एमआयएम कार्यकर्ते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. शाहिद शेख हे महापालिकेच्या अधिका यांच्या अंगावर धावून गेल्याने वाद चिघळला. यावेळी झालेल्या झटापटीत शेख यांना जमावाने चांगलाच चोप दिला. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.