
वेस्ट इंडिजच्या (West Indies) या विजयाचा नायक काइल मेयर्स (Kyle Mayers) होता. त्याच्या पहिल्या कसोटीत त्याने नाबाद दुहेरी शतक झळकावत वेस्ट इंडीजला तीन विकेट्सने जबरदस्त विजय मिळवून दिला.
बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने इतिहास रचला. बांगलादेशच्या चटगांव येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने ३९५ धावांचे लक्ष्य गाठले आणि अनेक विक्रम केले. आशियामधील सर्वात मोठा लक्ष्य गाठणारा हा संघ बनला आहे. या व्यतिरिक्त त्याने एकूण पाचवे सर्वात मोठे लक्ष्यही गाठले आहे.
वेस्ट इंडिजच्या या विजयाचा नायक काइल मेयर्स होता. त्याच्या पहिल्या कसोटीत त्याने नाबाद दुहेरी शतक झळकावत वेस्ट इंडीजला तीन विकेट्सने जबरदस्त विजय मिळवून दिला. मेयर्सने नाबाद २१० धावा फटकावल्या. त्याने ३१० चेंडूच्या नाबाद खेळीत २० चौकार आणि ७ षटकार लगावले आहे. पहिल्या डावात ४० धावा करणारा मेयर्सने सामन्यात एकूण २५० धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून पदार्पण सामन्यात तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
एवढेच नव्हे तर चौथ्या विकेटसाठी त्याने नुक्रमाह बोनार (८६) सह २१६ धावांची भागीदारी केली. १९८४ नंतर कोणत्याही विकेटसाठी वेस्ट इंडीजची चौथ्या डावात सर्वात मोठी भागीदारी होती, जी गेम चेंजर असल्याचेही सिद्ध झाली. चौथ्या डावात दुहेरी शतक ठोकणारा मेअर्स हा जगातील सहावा खेळाडू आहे. याशिवाय कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा करणाऱ्यां च्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आला आहे.
🔸Fifth-highest score on Test debut
🔸Second-highest by a West Indies player
🔸Only the sixth batsman ever to score a fourth-innings Test double ton
Take a bow, Kyle Mayers 🌟#BANvWI pic.twitter.com/scirmxoJWr
— ICC (@ICC) February 7, 2021
तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात ४३० धावा केल्या. यानंतर विंडीज संघाला केवळ २५९ धावा करता आल्या. बांगलादेशने आपला दुसरा डाव ८ विकेटवर २२३ धावा करुन घोषित केला आणि भेट देणाऱ्या संघाला विजयासाठी ३९५ धावांचे लक्ष्य दिले. विंडीज संघाने ७ विकेट गमावल्यानंतर ५ व्या दिवशी हे कामगिरी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला